VIDEO: शिखर धवनचा छोटासा 'अपघात'

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी शिखर धवनची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.

Updated: Oct 7, 2018, 09:01 PM IST
VIDEO: शिखर धवनचा छोटासा 'अपघात' title=

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी शिखर धवनची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही. शिखर धवनला या सीरिजसाठी आराम दिला का इंग्लंडविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे त्याला डच्चू देण्यात आला, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण टीममध्ये नसला तरी शिखर धवन त्याच्या कुटुंबासोबत एन्जॉय करतोय. शिखर धवननं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो मुलांसोबत खेळताना दिसत आहे.

मुलांसोबत लहान होण्याची मजा काही वेगळीच असते, असं म्हणत धवननं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शिखर धवन मुलांसोबत तीन चाकी सायकल चालवत आहे. या तीन चाकी सायकलवरून शिखर धवन पडलाही आहे. पडल्यानंतर शिखर धवन हसताना दिसत आहे.

वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतरही शिखर धवनला टेस्ट टीममध्ये सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यावर धवननं निराशा केली. पण नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये धवननं पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Bacho ke saath bachey bane ka maza hi kuch aur hai #withmykids #beingakid #familygoals

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on