मराठमोळ्या उद्योजकाने स्वत: घरी जाऊन दिलं Vinod Kambli ला ऑफर लेटर!

मागच्या काही दिवसांपासून विनोद कांबळी चर्चेत आहे. मराठी उद्योजकाने विनोद कांबळीला (Vinod Kambli) नोकरी ऑफर केलीये. ही नोकरी फायनान्स क्षेत्रातील आहे.

Updated: Sep 3, 2022, 12:38 PM IST
मराठमोळ्या उद्योजकाने स्वत: घरी जाऊन दिलं Vinod Kambli ला ऑफर लेटर! title=

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून विनोद कांबळी चर्चेत आहे. आर्थिक अडचणींचा सामना करत असलेला विनोद कांबळी (Vinod Kambli), भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवृत्तीवेतनावर त्याचं घर चालवत होता. आता मात्र त्याला मदतीचा हात दिला तो संदीप थोरात नावाच्या मराठी माणसाने. आर्थिक संकटामुळे विनोद कांबळीने नोकरीची मदत मागीलली होती. त्याच्या मदतीला मराठी उद्योजक या उद्योजकाने विनोद कांबळीला (Vinod Kambli) तब्बल 1 लाख रुपये महिना पगाराची नोकरी ऑफर केलीये. ही नोकरी फायनान्स क्षेत्रातील आहे. (vinod kambli accept job offer of marathi businessmen sandeep thorat)

मराठी उद्योजक आणि सह्यद्री मल्टिस्टेट फायनान्स कंपनीचे चेअरमन संदीप थोरात (Sandeep Thorat) यांनी विनोद कांबळीच्या घरी जाऊन नोकरीचं ऑफर लेटर दिलं आणि विनोद कांबळीने ही ऑफर (job offer) स्विकारली आहे. एकेकाळी क्रिकेटमध्ये कामगिरी करणारा विनोद कांबळी आता सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीच्या मुंबई शाखेत मानद संचालक म्हणून कामकाज करणार आहेत.
 
एका मुलाखतीत विनोद कांबळीने त्याच्या आर्थिक अडचणींबद्दल सांगतलं होत. त्याला नोकरीची गरज आहे आणि याबद्दल त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (Mumbai Cricket Association) मागणीही केली होती पण असोसिएशनकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असं त्याने सांगितल होतं. 

विनोद कांबळीबद्दल थोडक्यात...

विनोद कांबळी (Vinod Kambli) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे लहानपणापासून एकमेकांचे खास मित्र होते. या दोघांनीही एकाच शाळेत शिक्षण घेतलं असून, स्वर्गीय रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते.

विनोद कांबळी याने करिअरच्या पहिल्या 7 सामन्यात 793 धावा करून खळबळ उडवली होती. सचिन तेंडूलकर आणि त्याने हॅरिस शिल्डमध्ये केलेला 664 धावांच्या भागीदारीचा विक्रम आजही अबाधित आहे. भारताकडून विनोद कांबळीने 2000 साली अखेरचा सामना खेळला होता. केवळ 17 सामन्यानंतर विनोद कांबळी संघाबाहेर पडला होता. वयाच्या 23 व्या वर्षी विनोदने अखेरची कसोटी खेळली होती. त्याची सरासरी 54 होती.

आर्थिक गर्तेत सापडलेल्या विनोंद कांबळीला अखेर नोकरीची ऑफर...वाचा