VIDEO: विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुंबईच्या रस्त्यावर स्कूटी राईड; कोणालाही नाही आलं ओळखता

विराट आणि अनुष्का शनिवारी मुंबईच्या रस्त्यांवर स्कूटीवरुन फिरताना दिसले

Updated: Aug 20, 2022, 10:10 PM IST
VIDEO: विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुंबईच्या रस्त्यावर स्कूटी राईड; कोणालाही नाही आलं ओळखता title=

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेत विराट कोहली सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे कपल लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघांचेही फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे त्यांना रस्त्यावर फिरणे कठिण आहे.

शनिवारी विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईच्या रस्त्यावरुन फिरायला निघाला होता. ओळख लपवण्यासाठी त्याने शक्कलही लढवली होती. मात्र तरीही मीडियाला याची माहिती मिळाली आणि त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

विराट आणि अनुष्का शनिवारी मुंबईच्या रस्त्यांवर स्कूटीवरुन फिरताना दिसले. पण सुरुवातीला हे कपल स्कूटीवर फिरताना त्यांना कोणीही ओळखू शकले नाही.

याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये विराट स्कूटी चालवत आहे तर अनुष्का त्याच्या मागे बसली आहे. विराटने हिरवा शर्ट आणि काळी पँट घातली आहे. त्याच्यासोबत त्याने मॅचिंग व्हाइट स्नीकर्स घातले आहेत. 

तर अनुष्का शर्मा ब्लॅक लूकमध्ये आहे. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पॅन्ट घातली आहे. दोघांनी मास्क घातलेले आहेत. दोघांनी स्कूटीवर हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्यांचा चेहरा दिसला नाही. मात्र पापाराझींनी विराट आणि कोहलीला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. 

दरम्यान, विराट कोहली लवकरच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये बऱ्याच दिवसांनी खेळणार आहे. त्यामुळे तो जोरदार सराव करत आहे आणि फिटनेसवर पूर्ण लक्ष देत आहे.

तर अनुष्का शर्माही चार वर्षांनंतर चकडा एक्सप्रेसमधून रुपेरी पडद्यावर दिसणार आहे, ज्यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. खूप दिवसांनी त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.