नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या दमदार प्रदर्शनाने नवनवे रेकॉर्ड्स करत आहे. त्याने अनेकदा त्याच्या क्रिकेटच्या कठिण वेळात साथ देण्यासाठी अनुष्काला क्रेडिट दिले आहे.
कोहलीने अनेकदा सांगितले आहे की, त्याला एक चांगला माणूस बनवण्यात अनुष्का शर्माचा कुठे ना कुठे सहभाग आहे. विराटने त्याच्या रिलेशनशिपबाबत एक नवा खुलासा केलाय.
गौरव कपूरसोबत एका शोमध्ये विराटने सांगितले की, एक क्रिकेटर असा आहे ज्याने त्याला रिलेशनशिपबद्दल योग्य मार्गदर्शन केलं होतं. विराट शोवर म्हणाला की, ‘आपलं न लपवण्यासाठी झहीर खान एक मोठं कारण राहिला आहे. तो पहिला असा व्यक्त आहे ज्याला मी माझ्या रिलेशनशिपबद्दल सांगितले होते. तेव्हा तो म्हणाला म्हणाला होता की, काहीही कर पण या नात्याला लपवू नकोस. तसे करशील तर तुलाच त्रास होईल’.
विराट म्हणाला, ‘झहीर मला म्हणाला होता की, तू रिलेशनशिपमध्ये आहे. आणि चुकीचं काही करत नाहीये. मी खरंच भाग्यशाली आहे की, याबाबतीत मी सर्वात पहिले झहीरला सांगितले. त्याने मला सल्ला दिला होता तो मी तेव्हापासूनच फॉलो करत आहे’.