मुंबई : क्रिकेटच्या मैदानामध्ये भारत आणि पाकिस्तानमधल्या खेळाडूंमधून विस्तवही जाताना दिसत नाही. या दोन्ही देशांमधल्या क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाडू आक्रमक होताना पाहायला मिळतात, पण मैदानाबाहेर मात्र भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू चांगले मित्र असल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. शोएब अख्तर आणि वसीम अक्रमसारख्या खेळाडूंचे भारतीय क्रिकेटपटूंसोबत मैत्रीचे संबंध आहेत.
भारत-पाकिस्तानचे खेळाडू अनेकवेळा एकमेकांची कौतुकही करताना पाहायला मिळतात. भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानचा बॉलर मोहम्मद आमीरचं कौतुक केलं होतं. यानंतर आता मोहम्मद आमीरनंही कोहलीची प्रशंसा केली आहे.
विराट कोहली एक चांगला आणि मोठ्या मनाचा माणूस आहे. मी नेहमीच माझ्या मित्रासाठी प्रार्थना करतो. मैदानामध्ये आपण जास्तीत जास्त मॅच खेळू अशी अपेक्षा आहे, असं ट्विट मोहम्मद इरफाननं केलं आहे.
What a gentleman @imVkohli is! Great player with a great heart. Prayers for you my friend. Hope that we play more often in grounds. #Respect https://t.co/ovKWuEM4TL
— Mohammad Irfan (@M_IrfanOfficial) November 6, 2017
या मुलाखतीमध्ये विराटनं शोएब अख्तरचंही कौतुक केलं होतं. यावर अख्तरनंही ट्विट करून कोहलीचे आभार मानले होते. विराट कोहली सध्या जगातला सर्वोत्तम खेळाडू असल्याचं शोएब म्हणाला होता.
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला होता. या विजयानंतर टी-20 क्रमवारीमध्ये न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला, तर पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर पोहोचला. टी-20 क्रमवारीमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे.