खराब कामगिरीचा फटका, विराटची पहिल्या क्रमांकावरून घसरण

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला.

Updated: Aug 13, 2018, 08:01 PM IST
खराब कामगिरीचा फटका, विराटची पहिल्या क्रमांकावरून घसरण title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला. या टेस्ट मॅचच्या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. पहिल्या टेस्टमध्ये १४९ रन आणि ५१ रनची खेळी केल्यामुळे विराट मागच्याच आठवड्यात पहिल्या क्रमांकावर गेला होता. पण लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराटनं २३ रन आणि १७ रनची खेळी केली. यामुळे त्याची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. ऑस्ट्रेलियाचा निलंबित खेळाडू स्टिव्ह स्मिथ पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

टेस्ट क्रमवारीमध्ये विराटची घसरण झाली असली तरी रवीचंद्रन अश्विन बॅट्समनच्या यादीमध्ये ६७व्या क्रमांकावरून ५७व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये अश्विननं २९ आणि नाबाद ३३ रनची खेळी केली होती. अश्विन हा दोन्ही इनिंगमध्ये भारताचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू होता. टेस्टच्या ऑल राऊंडरच्या यादीमध्येही अश्विन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अश्विननं दक्षिण आफ्रिकेच्या वर्नन फिलँडरला मागे टाकलं.

दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या जेम्स अंडरसननं ९ विकेट घेतल्या. यामध्ये पहिल्या इनिंगमधल्या ५ विकेटचा समावेश आहे. बॉलरच्या क्रमवारीमध्ये जेम्स अंडरसन पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. अंडरसनकडे आता ९०३ पॉईंट्स आहेत. ९०० पॉईंट्स कमावणारा अंडरसन इंग्लंडचा सातवा बॉलर ठरला आहे.

टॉप ५ बॅट्समन (टेस्ट)

स्टिव्ह स्मिथ - पहिला क्रमांक- ९२९ पॉईंट्स

विराट कोहली- दुसरा क्रमांक- ९१९ पॉईंट्स

जो रूट- तिसरा क्रमांक- ८५१ पॉईंट्स

केन विलियमसन- चौथा क्रमांक- ८४७ पॉईंट्स

डेव्हिड वॉर्नर- पाचवा क्रमांक-  ८२० पॉईंट्स

टॉप ५ बॉलर (टेस्ट)

जेम्स अंडरसन - पहिला क्रमांक- ९०३ पॉईंट्स

कागीसो रबाडा- दुसरा क्रमांक- ८८२ पॉईंट्स

रवींद्र जडेजा- तिसरा क्रमांक- ८४९ पॉईंट्स

वर्नन फिलँडर- चौथा क्रमांक- ८२६ पॉईंट्स

आर अश्विन- पाचवा क्रमांक- ८०२ पॉईंट्स

टॉप ५ ऑल राऊंडर (टेस्ट)

शकीब अल हसन- पहिला क्रमांक- ४२० पॉईंट्स

रवींद्र जडेजा- दुसरा क्रमांक- ३७८ पॉईंट्स

आर अश्विन- तिसरा क्रमांक- ३७४ पॉईंट्स

वर्नन फिलँडर- चौथा क्रमांक- ३७९ पॉईंट्स

जेसन होल्डर- पाचवा क्रमांक- ३५४ पॉईंट्स