नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग आपल्या धुव्वादार बॅटींगसाठी ओळखला जातो. त्याच्या दबंग बॅटींगपुढे अनेक बॉलर हताश व्हायचे. टेस्ट क्रिकेटमध्ये बॅटींगची नवी स्टाईल सेहवागने आणल्याचे बोलले जाते.
कसोटीत त्रिशतक ठोकणारा तो पहिला बॅट्समन ठरला. याआधी कोणत्या भारतीय प्लेअरने हा कारनामा केला नव्हता. त्यानंतर भारताकडून नायर दूसरा खेळाडू होता ज्याने टेस्ट मॅचमध्ये त्रिशतक लगावले.
सेहवागने पहिले त्रिशतक मार्च २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मुल्तानमध्ये झळकावले. त्याने दुसरे त्रिशतक २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावले. दोन त्रिशतक झळकावणाऱ्या सर ब्रॅडमन यांच्या विक्रमाची त्यांने बरोबरी केली.
४ डिसेंबर २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध तो आपल्या तिसऱ्या त्रिशतकाच्याजवळ होता. २५४ बॉलमध्ये त्याने २९३ रन्स बनविले होते. आता नवा विक्रम व्हायला फक्त ७ रन्सचीच गरज होती. टेस्ट इतिहासात त्रिशतक लगावून मोठा रेकॉर्ड आपल्यानावे करण्यास सेहवाग सज्ज झाला होता. पण असे झाले नाही. सेहवाग २९३ रन्सवर आऊट झाला.
जर सेहवागने त्रिशतक झळकावले असते तर टेस्ट क्रिकेटच्या सव्वा शे वर्षांच्या इतिहासातील तो पहिला बॅट्समन ठरला असता, ज्याचे नावे ३ त्रिशतक आहेत.
हा रेकॉर्ड सेहवागने बनविला नसला तरी सर्वात जलद ६ हजार रन्स बनविणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. सेहवागने आपल्या टेस्ट करिअरमध्ये १०४ मॅचमध्ये ८५८६ रन्स बनविले, ज्यामध्ये २३ शतकांचा समावेश होता.