ICC टूर्नामेंट्समध्ये भारत-पाक एकाच ग्रुपमध्ये का असतात?

आता प्रश्न असा आहे की, आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये का ठेवलं जातं?

Updated: Jan 24, 2022, 12:11 PM IST
ICC टूर्नामेंट्समध्ये भारत-पाक एकाच ग्रुपमध्ये का असतात? title=

मुंबई : भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना केवळ दोन देश नाही तर सगळेच क्रिेकेटप्रेमी उत्सुकतेने पाहतात. जेव्हा हा सामना रंगतो त्यावेळी दोन्ही टीममध्ये चुरस पहायला मिळतो. दोन देशांमधील ताणले गेलेले संबंध हे या मागचं मुख्य कारण मानलं जातं. चाहते अशा सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या हा व्होल्टेज सामन्याची क्रेज सर्वांनाच असते.

टूर्नामेंट्सच्या एकाच ग्रुपमध्ये का असतात दोन्ही टीम?

आता प्रश्न असा आहे की, आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये का ठेवलं जातं? याचं कारण म्हणजे दोन संघांमधील सामन्याबाबत चाहत्यांची क्रेझ आहे आणि आयसीसी त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतं. कारण हा सामना थेट प्रेक्षकांशी संबंधित आहे.

आयसीसीचं होऊ शकतं नुकसान

जर आयसीसीच्या टूर्नामेंट्समध्ये भारत पाकिस्तान वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असतील तर दोन्ही टीममध्ये सामना होण्याची शक्यता कमी असू शकते. चाहत्यांच्या आवडीच्या सामन्यांमुळे जाहिरातीच्या किंमती वाढतात आणि त्याचा नफाच्या स्वरूपात मिळतो. त्यामुळे असे सामने झाले नाहीत तर आयसीसीचं नुकसान होण्याची शक्यता असते.

आयसीसीतर्फे सांगण्यात आलं होतं की, 2021 चा हा टी-20 वर्ल्डकप टीव्हीवर जगभरात 16 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला. 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेलेला सामना या काळात टीव्ही व्ह्यूवरशिपच्या आघाडीवर होता. 

यावर्षी होणाऱ्या ICC T20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहे. 23 ऑक्टोबर 2022 रोजी हा सामना मेलबर्नच्या MCG ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे.