Jay Shah On domestic cricket : आगामी बांगलादेशविरुद्धच्या सिरीजपूर्वी (IND vs BAN) टीम इंडियाला मोठी उसंत मिळाली आहे. मात्र, बीसीसीआयच्या नियमांमुळे आता खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागतंय. अशातच दुलीप ट्रॉफीसाठी (Duleep trophy 2024) बीसीसीआयने चार संघांची घोषणा केली आहे. शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर हे चार कर्णधार असतील. या चार संघात टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. परंतू रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे या तीन खेळाडूंचा जावयाप्रमाणे लाड का केले जातायेत? असा सवाल क्रिडाविश्वातून विचारला जातोय. त्यावर आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी उत्तर दिलंय.
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगून त्यांच्यावरील कामाचा ताण वाढवण्यात काहीही अर्थ नाहीये. उलट दुखापत होण्याचा धोका आहे. आम्ही आमच्या खेळाडूंशी आदराने वागले पाहिजे आणि नोकरांसारखे नाही, असं जय शहा यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.
आम्ही क्रिकेटच्या बाबतीत थोडे कठोर आहोत. जडेजाला दुखापत झाली तेव्हा मीच त्याला फोन केला आणि त्याला देशांतर्गत खेळ खेळायला सांगितलं, आता हे निश्चित आहे, जो जखमी होऊन बाहेर जातो तोच भारतीय संघात येऊ शकतो, असंही जय शहा यांनी म्हटलं आहे.
टीम ए - शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, लोकेश राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वथ कावेरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत.
टीम बी - अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, रिषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, साई किशोर, मोहित अवस्थी, एन नटराजन.
टीम सी - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजित, हृथिक शौकीन, मानव सुतार, उमरान मलिक, व्यशक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडेय, आर्यन जुयाल, संदीप वॉरियर.
टीम डी - श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिकल, इशान किशन, रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेंगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.