जोकोविच, दिमित्रोव्ह दुसऱ्या फेरीत

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत दुसऱ्या फेरीत नोव्हाक जोकोविचने चेक रिपब्लिकच्या पावलासेकचा ६-२. ६-२, ६-१ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. अवघ्या दीड तासात जोकोविचने हा सामना जिंकला

Updated: Jul 7, 2017, 08:22 AM IST
जोकोविच, दिमित्रोव्ह दुसऱ्या फेरीत title=

विम्बल्डन : विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत दुसऱ्या फेरीत नोव्हाक जोकोविचने चेक रिपब्लिकच्या पावलासेकचा ६-२. ६-२, ६-१ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. अवघ्या दीड तासात जोकोविचने हा सामना जिंकला

बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने दुसऱ्या फेरीत सायप्रसच्या मार्कोस बगदातिसचा ६-३, ६-२, ६-१ असा पराभव केला. फ्रान्सच्या गाईल मॉनफिल्सने दुसऱ्या फेरीत ब्रिटनच्या काईल एडमंडचा ७-६, ६-४, ६-४ अशा पराभव केला.या दोघातला सामना अटीतटीचा झाला. पहिला सेट टायब्रेकरवर गेला. पहिला सेट ५६ मिनिटं चालला. पण मॉनफिल्सने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये बाजी मारली. 

अर्जेंटिनाच्या जुआन मार्टीन डेल पोर्टोचा लाटव्हीयाच्या गुलबीसने पराभव केला. ४-६, ४-६, ६-७ असा पोर्टोचा पराभव झाला. 

पहिलांच्या एकेरी सामन्यात पोलंडच्या रदवान्स्काने अमेरिकेच्या मॅकहेला नमवत तिसरी फेरी गाठली. रदवान्स्काने पहिला सेट ५-७ असा गमावला. मात्र अटीतटीच्या दुसऱ्या सेटमध्ये ७-६ असा विजय मिळवला तर तिसरा सेट ६-३ असा सहज जिंकला. 

रशियाच्या श्वेतलाना कुझनेत्सोवाने आपल्याच देशाच्या एकातेरिना माकारोव्हाचा सहज पराभव करत तिसरी फेरी गाठली. पहिला सेट कुझनेत्सोवाने ६-० ने जिंकला तर दुसरा सेट ५-७ असा जिंकला

तर महिला दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झाने आपली साथीदार फ्लिपकेन्ससह पुढची फेरी गाठली. मिर्झा फ्लिपकेन्स जोडीने झँग आणि  ओसाका जोडीचा ६-४, ६-३ असा पराभव केला.