Hockey Asian Champions Trophy 2023 : विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने साऊथ आफ्रिकेवर विजय मिळवतं गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं. त्या पाठोपाठा हॉकीच्या मैदानात भारतीय पोरींनी कमाल केली. भारतीय महिला हॉकी संघाने विद्यमान चॅम्पियन जपानवर 4-0 असा शानदार विजय मिळवतं, ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. संगीता कुमारी (17व्या मिनिटाला), नेहा (46व्या मिनिटाला), लारेमसियामी (57व्या मिनिटाला) आणि वंदना कटारिया (60व्या मिनिटाला) यांच्या गोलच्या जोरावर भारतीय संघाने जपानचा खातमा केला. त्यासोबतच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्यांदा आपल्या कब्जा मिळवला. (womens asian champions trophy india beat japan lift trophy Second time)
रांचीच्या मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात संपूर्ण सामन्यात भारतीय संघ फॉर्ममध्ये दिसला. सामन्याच्या 17व्या मिनिटाला संगीताने अप्रतिम गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिल्यामुळे खेळाडूंचं मनोबल वाढलं. एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर जपानने आक्रमण पवित्रा घेत 22व्या मिनिटाला गोल केला खरा पण, भारतीय कर्णधाराने व्हिडीओ रेफरल घेतला.
जपानाला सामन्याच्या 52 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती. डीमध्ये फाऊल झाल्यामुळे जपानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण संधीचंही सोनं जपानला करता आलं नाही. भारतीय गोलरक्षक सविता पुनियाने गोल रोखल्यामुळे जपानच्या पदरी निराशा पडली. त्यानंतर मात्र भारतीय पोरींना कमालच केली.
Here are your winners - Team India #IndiaKaGame #HockeyIndia #JWACT2023 pic.twitter.com/KO06y5ODBJ
— Hockey India (@TheHockeyIndia) November 5, 2023
भारताने 57व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर तिसरा गोल करुन विजयच निश्चित केला. त्यानंतर 60 व्या मिनिटाला वंदना कटारियाने मैदानी गोल करून संघाला 4-0 असा शानदार विजय पटकावला.
Deep Grace Ekka wins the Jharkhand Player of the Match, and Sangita Kumari is your JSW Rising Star of the match. #HockeyIndia #IndiaKaGame #JWACT2023 pic.twitter.com/lb52mzXQVh
— Hockey India (@TheHockeyIndia) November 5, 2023
भारताच्या दीप ग्रेस एक्का हिला सामनावीराचा पुरस्कार तर झारखंडच्या संगीता कुमारीला रायझिंग स्टारचा किताब बहाल करण्यात आला.