IND vs SA World Cup 2023 : टीम इंडियासमोर सर्वात तगडं आव्हान कोणतं असेल तर ते साऊथ अफ्रिका.., अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. मात्र, वर्ल्ड कपमध्ये ऐटीत चालणाऱ्या साऊथ अफ्रिकेचा (India vs South Africa) टीम इंडियाने कचरा केला आहे. विराट कोहलीचं (Virat Kohli) ऐतिहासिक शतक ठोकलं तर रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) भेदक माऱ्यासमोर साऊथ अफ्रिकेचे छावे ढेर झाले. टीम इंडियाने दिलेल्या 326 धावांचं आव्हान पार करताना साऊथ अफ्रिकेचा डाव 83 धावांवर कोसळला. या विजयासह टीम इंडियाने पाईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
टीम इंडियाने दिलेल्या 327 धावांचं आव्हान पार करताना साऊथ अफ्रिकेचा डाव 83 वर गडगडला. अफ्रिकेच्या डावाच्या दुसऱ्याच डावात सिराजने क्विंटन डी कॉकला बाद करत भारताला खातं उघडून दिलं. त्यानंतर बॉल स्पिन होत असल्याने रोहितने जडेजाला बॉलिंगला आणलं आणि जड्डूने कॅप्टनला निराश केलं नाही. जडेजाने कॅप्टन बावुमाला तंबूत पाठवलं. त्यानंतर शमीने आपले साऊथ अफ्रिकेला दोन धक्के दिले. त्यानंतर फिरकीचा मारा सुरूच राहिला अन् साऊथ अफ्रिकेचे वर्ल्ड कपमधील तगडे खेळाडू पत्त्यासारखे कोसळले अन् टीम इंडियाने 243 धावांनी विजय मिळवला आहे. साऊथ अफ्रिकेकडून मार्को यान्से याने सर्वाधिक 14 धावा केल्या. रविंद्र जडेजाने 5 विकेट घेतल्या तर शमी आणि कुलदीप यादवने 2-2 विकेट काढल्या.
Jadeja shines in Kolkata & how
The joy of taking 5 wickets in World Cup match #TeamIndia register their 8th consecutive win in #CWC23 #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/cd2HfMEfhy
— BCCI (@BCCI) November 5, 2023
कोलकता ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रीकेचा विरुद्ध भारताने नाणेफेक जिंकला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. नियोजनाप्रमाणे रोहित आणि प्रिन्स शुभमन गिलने दमदार सुरूवात करून दिली. मात्र, सहाव्या ओव्हरमध्ये रोहित बाद झाला. तर 11 व्या ओव्हरमध्ये शुभमन गिल देखील फिरकीच्या जाळ्यात अडकला. तर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यर आणि विराटने साऊथ अफ्रिकेच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरू केलं. अय्यरने 77 धावांची विराट खेळी केली. मात्र, विराटने मैदानात पाय जमवले अन् वनडे क्रिकेटमधील अविश्वनीय कामगिरी करून दाखवली. विराटची स्वप्नपूर्ती (Virat Kohli 49th Century) झाली. विराटच्या शतकानंतर जड्डूने आपली तलवारबाजी सुरू केली. जडेजाने 15 बॉलमध्ये 29 धावांची वादळी खेळी केली आणि टीम इंडियाला 326 धावांवर पोहोचवलं.
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी.