मॅन्चेस्टर : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडिया एक बदल करून मैदानात उतरली. शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे ऑलराऊंडर विजय शंकरला संधी देण्यात आली आहे. भारत आर्मीने विजय शंकरसाठी एक खास गाणं तयार केलं आहे. भारत आर्मीच्या या गाण्याला आयसीसीने आपल्या अकाऊंटवरून शेअर केलं आहे. 'जय-जय विजय शंकर, ही पुल अवे द बाऊन्सर, ही इज बॅटिंग ऑलराऊंडर...' हे गाणं भारत आर्मीने विजय शंकरसाठी तयार केलं आहे.
Jay Jay Vijay Shankar, he'll pull away the bouncer, he's a batting all-rounder @thebharatarmy has a special musical reception planned for one of its stars. pic.twitter.com/cziQUtyV1a
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 16, 2019
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये शिखर धवनला दुखापत झाली. यामुळे शिखर धवनऐवजी विजय शंकरला संधी देण्यात आली आहे. शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी शिखर धवनला कमीत कमी १५ दिवस लागणार आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये कर्णधार विराट कोहलीकडे दिनेश कार्तिक किंवा विजय शंकरला टीममध्ये घ्यायचा पर्याय होता. पण विराटने विजय शंकरला पसंती दिली. विजय शंकरची वर्ल्ड कपमधली ही पहिलीच मॅच आहे. वर्ल्ड कपसाठीची टीम निवडताना निवड समिती आणि विराट कोहलीने अंबाती रायुडू आणि ऋषभ पंत यांच्याऐवजी विजय शंकरला १५ सदस्यीय टीममध्ये संधी दिली होती. विराटने दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्याचं आव्हान विजय शंकरपुढे असेल.