World cup 2019: सिक्सचं वादळ येण्याची शक्यता

वेस्टइंडिजच्या टीममध्ये अनेक सिक्सर किंग आहेत. 

Updated: Jun 14, 2019, 04:00 PM IST
World cup 2019: सिक्सचं वादळ येण्याची शक्यता  title=

साऊथम्पटन : यजमान इंग्लंड आणि वेस्टइंडिज यांच्यात आज (१४ जून) सामना रंगत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मॅचमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. परंतु आज वादळ येण्याची शक्यता आहे. पण हे वादळ सिक्सचं असणार आहे. वेस्टइंडिजच्या टीममध्ये अनेक सिक्सर किंग आहेत. त्यामुळे आजच्या मॅचमध्य़े क्रिकेट चाहत्यांना सिक्सचा तुफान पाहायला मिळू शकतो.

ख्रिस गेल

ख्रिस गेलकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत ख्रिस गेल याचा दुसरा नंबर आहे. वनडेत ख्रिस गेलच्या नावे ३१७ सिक्सची नोंद आहे.

वर्ल्डकप २०१५ मध्ये गेलच्या नावे 18 सिक्स आहेत. त्याने हे 18 सिक्स 5 इनिंगमध्ये ठोकले होते. वर्ल्डकप 2015 च्या स्पर्धेत सर्वाधिक सिक्स मारण्याच्या बाबतीत गेलचा दुसरा नंबर आहे.

गेलने इंग्लंड विरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये 2 शतकं लगावले होते. सोबतच त्याने 39 सिक्स मारले. त्यामुळे ख्रिस गेलला आजच्या सामन्यात रोखण्याचे आव्हान इंग्लंडच्या बॉलर्सपुढे असणार आहे.

वेस्टइंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपमध्ये एकूण 6 सामने खेळण्यात आले आहे. यापैकी केवळ 1 मॅच वेस्टइंडिजने जिंकली आहे. तर इतर 5 मॅच या इंग्लंडने जिंकल्या आहेत.