close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, वर्ल्ड कपमधला विक्रम कायम

वर्ल्ड कपच्या सगळ्यात महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचला सुरुवात झाली आहे.

Updated: Jun 16, 2019, 11:59 PM IST
World Cup 2019 : भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, वर्ल्ड कपमधला विक्रम कायम

मॅन्चेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

LIVE UPDATES

- भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, ८९ रननी विजयी

- पावसानंतर पुन्हा मॅचला सुरुवात, डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला विजयासाठी ३० बॉलमध्ये १३६ रनची गरज

-पावसामुळे पुन्हा सामना थांबला, पाकिस्तानचा स्कोअर ३५ ओव्हरमध्ये १६६/६

- पाकिस्तानची सहावी विकेट, विजय शंकरच्या बॉलिंगवर सरफराज १२ रनवर आऊट

- हार्दिक पांड्याचा डबल धमाका, पाकिस्तानची पाचवी विकेट, शोएब मलिक शून्य रनवर आऊट

- पाकिस्तानला चौथा धक्का, मोहम्मद हफीज ९ रनवर आऊट

- पाकिस्तानची तिसरी विकेट, कुलदीप यादवने फकर जमानला आऊट केलं

-पाकिस्तानची दुसरी विकेट, कुलदीप यादवने बाबर आझमला माघारी धाडलं

- पाकिस्तानला पहिला धक्का, इमाम उल हक ७ रनवर आऊट

- ५० ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर ३३६/५

- भारताला मोठा धक्का, विराट कोहली ६५ बॉलमध्ये ७७ रन करुन आऊट

-पावसाच्या व्यत्ययामुळे पुन्हा सामन्याला सुरुवात

-पावसामुळे सामन्यात व्य़त्यय, क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा 

- टीम इंडियाला चौथा धक्का, एमएस धोनी १ रन करुन आऊट

- हार्दिक पांड्या १९ बॉलमध्ये २६ रन करून आऊट

- कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक, टीम इंडियाची फटकेबाजी

- धमाकेदार शतक करून रोहित शर्मा आऊट, ११३ बॉलमध्ये १४० रनची खेळी

- रोहित शर्माचं धमाकेदार शतक, ८५ बॉलमध्ये झळकावलं शतक

- भारताला पहिला धक्का, केएल राहुल ७८ बॉलमध्ये ५७ रन करून आऊट

- रोहित शर्मानंतर केएल राहुलचंही अर्धशतक

टीम इंडियाचं शतक पूर्ण, १७.३ ओव्हरमध्ये टीम इंडिया १००/०

-रोहित शर्माचं धमाकेदार अर्धशतक

या मॅचमध्ये पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने या मॅचमध्ये एक बदल केला आहे. दुखापतग्रस्त शिखर धवनऐवजी विजय शंकरला टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

टॉस जिंकलो असतो तर आपणही पहिले बॉलिंगच घेतली असती, अशी प्रतिक्रिया कर्णधार विराट कोहलीने दिली आहे. आम्ही चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत आहोत, त्यामुळे टीममध्ये बदल करण्याची गरज नाही. शिखर धवनचा बदल मात्र पर्याय नसल्यामुळे करावा लागल्याचं, विराट म्हणाला.

टीम इंडिया

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), विजय शंकर, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

पाकिस्तानची टीम

इमाम उल हक, फकर झमान, बाबर आझम, मोहम्मद हफीज, सरफराज अहमद, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, वहाब रियाझ, मोहम्मद आमिर

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ मॅच झाल्या आहेत. यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११ आणि २०१५ या वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान एकमेकांना भिडले होते.