World Cup 2023 Points Table: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये आज म्हणजेच शनिवारी 2 सामने होणार आहे. चिन्नस्वामी स्टेडियममध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. मागील 3 सामान्यांमध्ये पराभूत झालेल्या न्यूझीलंडच्या संघाला पुढील दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. दुसरीकडे पाकिस्तानी संघाला सेमीफायनल्समध्ये पात्र होण्याआधी मोठ्या विजयाची आवश्यकता आहे. न्यूझीलंडचा संघ उरलेल्या त्यांच्या 2 सामन्यांपैकी एक जरी सामना पराभूत झाला तर ते स्पर्धेबाहेर पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला तर सेमीफायनलमधून बाहेर पडेल. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. पाऊस पडल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण वाटून दिला जाईल.
पाकिस्तानी संघाने न्यूझीलंडला पराभूत केलं तर पाकिस्तानच्या संघाला 2 पॉइण्ट्स मिळतील. तर न्यूझीलंडचा संघ पुढील दोन्ही सामने पराभूत झाला तर पाकिस्तान, श्रीलंका दोघांचे प्रत्येकी 10-10 पॉइण्ट्स असतील. मात्र पाऊस पडला तर दोन्ही संघांना 1-1 पॉइण्ट वाटून दिला जाईल. त्यामुळे पाकिस्तानचे एकूण 7 पॉइण्ट्स होतील आणि न्यूझीलंडचे एकूण 9 पॉइण्ट्स होतील. पुढील सामन्यामध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत केल्यास नेट रन रेटच्या जोरावर वरचढ ठरण्यासाठी पाकिस्तानी संघाला इंग्लंडला फार मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. मात्र पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्यास न्यूझीलंड आणि पाकिस्तानी दोन्ही संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
आश्चर्याचा बाब म्हणजे अफगाणिस्तान साखळी फेरीमधील आपले दोन्ही सामने जिंकला तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडलीत. अफगाणिस्तानने आपल्या 7 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि इंग्लंडलाही पराभीत केलं आहे. मात्र अफगाणिस्तानचे शेवटचे 2 सामने हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत. त्यामुळे पाकिस्तान इंग्लंड आणि न्यूझीलंड दोन्ही संघांना पराभूत करु शकला आणि दुसरीकडे अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडला पराभूत करण्याचा भीमपराक्रम केला तरी पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडेल. न्यूझीलंडला अफगाणिस्तानपेक्षा सरस राहण्यासाठी मोठ्या फरकाने दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. दुसरीकडे पाकिस्तानी संघ न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत झाल्यास आणि अफगाणिस्तानने दोन्ही सामने जिंकल्यास ते चौथ्या स्थानावर राहतील.
अफगाणिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर राहिला आणि भारत पहिल्या स्थानी राहिला तर सेमीफायनलचा सामना भारत आणि अफगाणिस्तानमध्ये होईल. या स्थितीमध्ये भारताचा फायनलमधील प्रवेश जवळपास निश्चित मानला जाईल.