Rashid Khan On Afghanistan people : दिल्लीच्या स्टेडियमवर अफगाणिस्तानने न भुतो... असा विजय मिळवला. रोमांचक अशा सामन्यात अफगाणी सैन्याने इंग्लंडचा 69 धावांनी (AFG vs ENG) पराभव केला अन् ऐतिहासिक विजय नावावर केला आहे. दिल्लीच्या मैदानावर राशिद अँड कंपनीला भरभरून प्रेम मिळालं. राशिद (Rashid Khan) मैदानात आला अन् प्रेक्षकांनी राशिद राशिदच्या घोषणा दिल्या. तर तगड्या इंग्लंडला नाही तर अफगाणिस्तानला दिल्लीकरांचा पाठिंबा मिळताना दिसला. अशातच सामना जिंकल्यानंतर राशिद खान भावूक झाल्याचं दिसला. सामना झाल्यानंतर राशिदने अफगाणिस्तानच्या (Afghanistan people) नागरिकांसाठी अशी काही प्रतिक्रिया दिली की, अनेकांचं मन भरून आलंय.
दिल्ली खरोखर दिल वालो की है, असं राशिद खान म्हणतो. आम्ही प्रेक्षकांनी खूप समर्थन दिलं. आजचा हा विजय अफगाणी लोकांसाठी आहे. अफगाणिस्तानात क्रिकेट हेच आनंदाचे स्त्रोत आहे, तिथं नुकताच भूकंप झाला, अनेकांनी सर्वस्व गमावलं, यामुळे आजच्या विजयामुळे त्यांना थोडा आनंद मिळेल, अशी मला अपेक्षा आहे, असं राशिद खान म्हणाला आहे. त्यावेळी त्याने प्रेक्षकांचे देखील आभार मानले.
अफगाणिस्तानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात हजारो जण ठार झाल्याच्या दुर्घटनेला आठवडा उलटत नाही तोच रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. 6.3 रिशटर स्केलच्या या भूकंपात अनेक गावच्या गावं जमिनदोस्त झाल्याचं पहायला मिळतंय. मागील 10 दिवसात अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे 4 मोठे धक्के बसल्याचं दिसून आलंय. त्यामुळे मोठमोठ्या बिल्डिंग देखील कोसळल्या आहेत. अशातच आता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातीये. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Rashid Khan said "Cricket is the only source of happiness in Afghanistan, recently there was an Earthquake, many lost everything, this will give them some happiness - this is for them". pic.twitter.com/NSOp3SP9kV
— Johns. (@CricCrazyJohns) October 15, 2023
दरम्यान, मागील वर्षी तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळावला, तेव्हापासून अफगाणी लोकांच्या आयुष्यात दररोज नवं संकट येत आहेत. नुकत्याच झालेल्या भूकंपात अनेक महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या संघातील खेळाडूंनी आपली प्राईझ मनी भूकंपग्रस्तांच्या नावे केली आहे.