WTC 2021 Final: केन विल्यमसननं जिंकला टॉस, टीम इंडियाची पहिली फलंदाजी

अखेर प्रतीक्षा संपली असून फायनली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होत आहे.

Updated: Jun 19, 2021, 02:46 PM IST
WTC 2021 Final: केन विल्यमसननं जिंकला टॉस, टीम इंडियाची पहिली फलंदाजी

मुंबई: अखेर प्रतीक्षा संपली असून फायनली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात नाणेफेक झाली आहे. किवी संघाने पहिला टॉस जिंकला असून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहाजिकच टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्याचा पहिला अर्थातच 18 जूनचा दिवस हा पावसामुळे वाया गेला. पावसानं मैदानात खेळ केल्यामुळे पहिल्या दिवसाचा सामना स्थगित करावा लागला होता. आता टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागणार आहे. 

टीम इंडिया प्‍लेइंग इलेवन रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रवि अश्विन, इशांत शर्मा, मोहम्‍मद शमी, जसप्रीत बुमराह असा टीम इंडियाचा संघ मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीनं कोणताही बदल केलेला नाही.