इंग्लंड दौऱ्याआधी जड्डूने MS Dhoniला केलं मिस...फोटो शेअर करत म्हणाला

इंग्लंड दौऱ्याआधी जड्डूने खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एम एस धोनी आणि जडेजा दिसत आहेत.

Updated: May 27, 2021, 09:45 AM IST
इंग्लंड दौऱ्याआधी जड्डूने  MS Dhoniला केलं मिस...फोटो शेअर करत म्हणाला title=

 टीम इंडिया 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान आहे. न्यूझीलंड विरुद्ध हा सामना होणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध सीरिज खेळली जाणार आहे. टीम इंडियामध्ये रविंद्र जडेजानं कमबॅक केल्यामुळे विराट कोहलीसह इतर सदस्य खूपच खूश आहेत. 

इंग्लंड दौऱ्याआधी जड्डूने खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एम एस धोनी आणि जडेजा दिसत आहेत. थ्रोबॅक इंग्लंड टूर असं कॅप्शन देत जडेजानं हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून लक्षात येईल की जड्डू माहीभाईला किती मिस करतो आहे. 

इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविंद्र जडेजा महेंद्रसिंह धोनीला खूप मिस करत आहे. इंग्लंडमध्ये धोनीच्या  नेतृत्वात टीम इंडियाने उव्वल अशी कामगिरी केली नाही. माहीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडच्या भूमीवर 6 कसोटी सामने खेळले, त्यापैकी टीम इंडियाने केवळ एक कसोटी सामना जिंकला. 

यापूर्वी 5 वेळा टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. धोनीच्या नेतृत्वामध्ये 2011 ला पहिल्यांदा टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडिया खेळणार आहे. टीम इंडियाला इंग्लंडच्या घरच्या मैदानात पराभूत करण्यात यश मिळणार का याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे.