मुंबई : युझवेंद्र चहलबाबत केलेल्या वक्तव्यावर अखेर युवराज सिंगने माफी मागितली आहे. रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट करत असताना युवराज सिंगने चहलबाबत जातीवाचक टिप्पणी केली होती. यानंतर युवराजवर सोशल मीडियावर टीका झाली होती. तसंच 'युवराज सिंग माफी मांगो' हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेन्डिंगमध्ये होता. या वक्तव्यावरून युवराजविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रारही करण्यात आली होती.
या सगळ्या वादावर आता युवराज सिंगने स्पष्टीकरण दिलं आहे. 'मी जात, वर्ण किंवा लिंगावरून कधीही असमानता केली नाही. माझं आयुष्य मी लोकांच्या कल्याणासाठी घालवलं आणि घालवंत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मी प्रत्येक व्यक्तीला आदर दिला. मित्रासोबत बोलत असताना केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. जबाबदार भारतीय म्हणून मी जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो,' असं ट्विट युवराजने केलं आहे. भारत आणि भारतीय नागरिकांबाबतचं माझं प्रेम शाश्वत आहे, असंही युवराज म्हणाला.
— yuvraj singh (@YUVSTRONG12) June 5, 2020
युझवेंद्र चहलबाबतचं वक्तव्य केल्यानंतर युवराज चांगलाच अडचणीत आला होता. हिसारच्या हांसीमध्ये दलित अधिकार कार्यकर्ते आणि वकिल रजत कलसन यांनी युवराजविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली.
युवराजच्या या वक्तव्यानंतर रोहित शर्माने त्याला समज द्यायला हवी होती, तसंच त्याचा विरोध केला पाहिजे होता, पण रोहितने हसून युवराजचं समर्थनच केलं. यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या, अशी प्रतिक्रिया कलसन यांनी दिली. रजत कलसन यांनी युवराज सिंगला अटक करण्याची मागणीही केली.
Yuvraj said 'bhangi' to chahal in live with rohit sharma
The word Yuvraj used for chahal was wrong.
So people trend #युवराज_सिंह_माफी_मांगोpic.twitter.com/Qxi8Y7q8HQ
— naman (@iamns3010) June 1, 2020
युझवेंद्र चहलने त्याच्या वडिलांसोबत टिकटॉकवर एक व्हिडिओ टाकला. या व्हिडिओवरून रोहित शर्मा आणि युवराज सिंग चहलची मस्करी करत होते. हे सुरू असतानाच युवराजने चहलबाबत जातीवाचक उल्लेख केला.