अण्णा हजारे

राजकारण... घाणीची दलदल - अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याशी फारकत घेतल्यानंतर अण्णांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.

Sep 30, 2012, 06:02 PM IST

अण्णांचा ब्लॉग... कुणावर राग?

अरविंद केजरीवाल यांनी टीम अण्णा फोडली ? अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय? अण्णांना कुणी धोका दिलाय ? हे प्रश्न पडण्याचं कारण आहे अण्णांचा नवा ब्लॅग... या ब्लॉगमध्ये अण्णांनी टीम अण्णा का फुटली याची कारण सांगितली आहेत.

Sep 30, 2012, 07:39 AM IST

लवकरच पुन्हा एकत्र येऊ- केजरीवाल

अण्णांपासून दूरावलेल्या अरविंद केजरीवाल यांनी अण्णा आणि आपण लवकरच पुन्हा एकत्र येऊ, असा आशावाद व्यक्त केलाय. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांना अण्णांनी त्यांचा फोटो किंवा नाव वापरण्याला बंदी घातली आहे. दोघांमधले संबंध टोकाचे दुरावलेत. मात्र, तरीही अण्णा आणि आपण येत्या तीन-चार महिन्यांत पुन्हा एकत्र येऊ, असा आशावाद केजरीवाल यांना वाटतोय.

Sep 24, 2012, 08:00 AM IST

सुरेश पठारेंची हकालपट्टी झाली- सप्तर्षी

सुरेश पठारेनी राजीनामा दिलेला नाही. तर, त्यांना काढण्यात आल्याची शक्यता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केलीय.

Sep 23, 2012, 09:30 PM IST

केजरीवालांनी अण्णांना ऑफर केले होते २ कोटी रुपये

`इंडिया अगेन्सट करप्शन`चे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना आयएसीमधील उरलेली रक्कम देऊ केली होती. ही रक्कम २ कोटी रुपये इतकी आहे.

Sep 23, 2012, 12:43 PM IST

सुरेश पठारेंचा अण्णांच्या आंदोलनाला राम-राम

पठारे यांनी आपला भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा त्यांचा राजीनामा अण्णांकडे सोपवला असून अण्णांनी पठारेंचा राजीनामा मंजूर केला आहे.

Sep 22, 2012, 10:51 PM IST

मी टीम अण्णा फोडली नाही- बाबा रामदेव

टीम अण्णा दुभंगल्यानंतर, आपण टीम अण्णा फोडली नाही, असा खुलासा बाबा रामदेव यांनी केलाय. अण्णा हजारे यांनी स्वत:च हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. अण्णा आणि केजरीवाल यांच्यात फाटाफूट झाल्याचं सध्या दिसतंय.

Sep 22, 2012, 05:49 PM IST

पवित्र स्थळावर ‘गंदी बातें’ नको - अण्णा

नवीन टीम अण्णा आणि भ्रष्टाचारासारखी ‘गंदी बात’ मंदिरात करु नका, असं काल अण्णांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

Sep 21, 2012, 08:24 AM IST

अण्णांच्या निर्णयानं केजरीवालांना धक्का

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांना अण्णांच्या कालच्या वक्तव्यामुळे धक्का बसलाय.

Sep 20, 2012, 12:30 PM IST

केजरीवाल यांना अण्णांचं नाव वापरण्यासही मनाई

अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये फूट पडली असल्याचं उघडपणे अण्णा हजारेंनी जाहीर केलं. केंद्र सरकारने निवडणुकांपूर्वी लोकपाल आणावे, अन्यथा आपण देहत्याग करू असा इशारा अण्णांनी आज पत्रकार परिषदेत दिला. पण त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांचा आता आपल्या पक्षाशी कुठलाही संबंध राहिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Sep 19, 2012, 11:25 PM IST

`आमचे मार्ग वेगळे, ध्येय एकच`

माजी टीम अण्णांमध्ये आता दुफळी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय. खुद्द अण्णा हजारेंनीच तशी कबुली दिलीय.

Sep 18, 2012, 04:31 PM IST

अण्णा हजारेंची नवी खेळी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता नव्या टीमची बांधणी सुरू केलीय. देशभरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना अण्णांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला जुडण्य़ाचं आवाहन केलंय.

Sep 17, 2012, 03:13 PM IST

त्रिवेदी नव्हे, कोळसा घोटाळा करणारे देशद्रोही- अण्णा

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींच्या अटकेबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही सरकारवर टीका केलीय. कोळसा घोटाळा करणारे देशाला लूटत आहेत. त्यामुळं तेच खरे देशद्रोही असल्याची घणाघाती टीका अण्णांनी केली आहे.

Sep 12, 2012, 06:56 PM IST

दलाई लामांनी केलं बाबांच्या आदोलनाचं कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्या आंदोलनाचं तिबेटीयन बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी कौतुक केलंय. हिंसा आणि भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय. आसाम आणि त्यानंतर सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचाराचाही दलाई लामा यांनी निषेध केलाय..

Aug 14, 2012, 08:49 AM IST

पार्टीचा निर्णय अण्णांचाच - केजरीवाल

राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय अण्णा हजारेंचा होता, असा दावा टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केलाय. अण्णांनी जर सांगितलं तर आम्ही माघार घ्यायला तयार असल्याचंही केजरीवालांनी ट्विटरवर सांगितलंय.

Aug 12, 2012, 06:49 PM IST