रामदेवबाबांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन
योगगुरु रामदेवबाबा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींबाबत केलेल्या विधानामुळे देशभरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय. विविध भागांमध्ये बाबा रामदेव यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत.
Apr 27, 2014, 10:36 PM IST`आम आदमी` आज मुंबई दौऱ्यावर...
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ते मुंबईत येत आहेत.
Mar 12, 2014, 09:44 AM ISTकोल्हापुरातील टोल वसुली थांबविण्याचे कोर्टाचे आदेश
कोल्हापुरात टोलवसुली थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आयआरबी कंपनीला ही मोठी चपराक असल्याचं मानलं जातंय.
Feb 28, 2014, 08:17 AM ISTजितेंद्र आव्हाडांनी काढली राज ठाकरेंची `अक्कल`
नक्कल करण्याची अक्कल नसल्यानं राज ठाकरेंच्या आजच्या टोलविरुद्धच्या आंदोलनाची फजिती झाली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. ते पुण्यात बोलत होते.
Feb 12, 2014, 10:57 PM ISTभर कॅबिनेटमध्ये उडविली गेली राज ठाकरेंची खिल्ली...
राज ठाकरे यांच्या आंदोलनाला रस्त्यावर प्रतिसाद मिळाला नाहीच, दुसरीकडे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. उलटपक्षी मंत्रिमंडळ बैठकीत राज ठाकरे यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्यात आली.
Feb 12, 2014, 08:49 PM ISTआंदोलन फसलं... 'चर्चा' तर होणारच!
टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या ३६० मिनिटांत संपलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी ३६० अंशात यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आजचं आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं? असा सवाल उपस्थित केला जातोय.
Feb 12, 2014, 06:31 PM IST...असं होतं महाराष्ट्रभर मनसे आंदोलनाचं चित्र!
मनसेच्या आजच्या आंदोलनात राज ठाकरे यांच्या अटक आणि सुटकेनंतर दादर आणि डोंबिवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
Feb 12, 2014, 05:38 PM ISTराज ठाकरे - मुख्यमंत्री चर्चा मीडियासमोर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.
Feb 12, 2014, 05:18 PM ISTआंदोलन टोलनाक्यांवर, शहरांमधील वाहतूक सुरळीत
मनसे टोल आंदोलनाचा शहर वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. हे आंदोलन टोल नाक्यांवर होणार आहे.
Feb 12, 2014, 08:43 AM ISTखबरदार! टायर जाळताय भरा २५ कोटींचा दंड!
कुठलाही प्रश्न पेटवायचा ठरला की रस्त्यावर उतरुन आंदोलन करायचं... आंदोलन किती भडकलंय हे दाखवायला जाळपोळ करायची... आणि त्यासाठी पेटंट म्हणजे टायर जाळायचे... पण आता हे टायर जाळणं चांगलंच महागात पडणार आहे... तब्बल २५ कोटींपर्यंत दंड होणार आहे. त्यामुळं राजकीय नेत्यांनाही ही टायर जाळणारी आंदोलनं बरीच महागात पडणार आहेत.
Feb 7, 2014, 11:43 AM ISTआयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार, फेरमुल्यांकन - सीएम
कोल्हापूरतील आयआरबीच्या टोलविरोधात रान उठलं असताना राज्य सरकारनं अखेर त्याची दखल घेतलीय. आयआरबी कंपनीने तयार केलेल्या रस्त्यांचं फेरमुल्यांकन करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. आयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार असल्याचंही सतेज पाटील यांनी सांगितलं.
Feb 6, 2014, 10:05 PM ISTकोल्हापुरात पुन्हा पोलीस बंदोबस्तात टोल वसुली सुरू
कोल्हापुरात शिरोली टोल नाक्यावर टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात याठिकाणी टोल वसुलीला सुरुवात झालीय. कोल्हापूरकरांचा विरोध असतानाही IRB टोल वसुली करणार असल्याची भूमिका घेतलीय आहे.
Feb 5, 2014, 12:43 PM ISTराहुल गांधींच्या घरासमोर पुन्हा शीख संघटनांचं आंदोलन
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 साली उसळलेल्या शीख विरोधी दंग्याचं भूत काँग्रेसच्या मानगुटीवर पुन्हा बसल्याचं चित्र आहे. 1984 दंगलीविरोधात आज पुन्हा एकदा राहुल गांधींच्या घराबाहेर शीख संघटनांनी निदर्शनं केली.
Feb 3, 2014, 05:27 PM ISTआता केजरीवालांच्या विरोधात आंदोलन..
अरविंद केजरीवालांनी निवडणुकीपूर्वी कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आश्वासन दिलं होत. केजरीवालांनी कंत्राटी कामगारानां दिलेल आश्वासन पूर्ण न केल्यामुळे, कंत्राटी कामगारांनी केजरीवालांच्या विरोधात आंदोलनाचं शस्त्र उगारलं आहे. त्यामुळे दिल्लीतील सरकारी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.
Jan 30, 2014, 06:09 PM ISTशीख संघटनांची दिल्लीत काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शनं
राहुल गांधी यांनी एका इंग्रजी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानंतर शीख संघटना आक्रमक झाल्या आहेत. काही शीख संघटनांनी आज दिल्लीतील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे.
Jan 30, 2014, 02:31 PM IST