अरविंद केजरीवालांचं, गरज सरो... वैद्य मरो!
जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत, बेमुदत उपोषण सुरू केलंय... तर दुसरीकडं आम आदमी पार्टीचा आणि पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा अजूनही विजयाचा जल्लोष सुरू आहे.
Dec 11, 2013, 06:07 PM ISTयापूर्वी १६ वेळा एकट्यानंच यशस्वी केली आंदोलनं - अण्णा
जनलोकपालसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत आजपासून (मंगळवार) पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय.
Dec 10, 2013, 10:37 PM ISTशिक्षक आणि महिला शिक्षिकांचे रात्रभर ठिय्या आंदोलन
ठाणे जिल्हा परिषदेमधील ग्रामीण भागातील शिक्षकांच्या बदल्या चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याचं सांगून त्याविरोधात जिल्हापरिषद शिक्षक आणि सभादांनी आंदोलन केलंय. वारंवार मागणी करून सुध्दा त्याकडे शासन आणि जिल्हा अधिका-यांनी पाठ फिरवल्यानं त्याविरोधात शिक्षकांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलंय. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला शिक्षिकाही सामील होत्या.
Dec 8, 2013, 03:55 PM ISTउसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.
Nov 29, 2013, 07:49 PM ISTड्रायव्हिंगसाठी सौदी अरेबियात महिलांचं आंदोलन
आपल्यालाही पुरुषांप्रमाणेच ड्रायव्हिंगचा हक्क मिळावा, यासाठी सौदी अरेबियाच्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. सौदी अरेबियात महिलांच्या ड्रायव्हिंगवर बंदी असल्यामुळे त्याविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.
Oct 27, 2013, 05:30 PM ISTनाशिकमध्ये मनसेचं ‘डॉक्टर’स्टाईल आंदोलन
डॉक्टरांवर सुरू असलेल्या कारवाई विरोधात पुणे महापालिकेच्या सभागृहात काल मनसेच्या नगरसेवकांनी अनोखं आंदोलन केलं.
Oct 22, 2013, 11:21 AM ISTकोल्हापुरात आजपासून टोल वसुली, आंदोलकांचा ठिय्या!
कोल्हापुरात आजपासून टोल वसुली सुरू होतेय. त्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. परिसरात कलम १४४लागू करण्यात आलाय.
Oct 17, 2013, 11:03 AM ISTविद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, मंत्र्यांचं आश्वासन
आरोग्य विज्ञान विघापीठानं दुहेरी पेपर तपासणी सुरू केल्यामुळं विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये नाराजी आहे. पेपर दोघांकडून तपासून घेऊन त्याची सरासरी काढण्याची पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. यामुळे मेडिकलचे तब्बल ११ हजार ९०० विद्यार्थी नापास झालेत. त्यामुळं ही पद्धत बदलण्याची मागणी जोर धरतेय. मार्डनंही याविरोधात संपाची हाक दिलीये.
Oct 14, 2013, 08:29 PM ISTजगनमोहन, चंद्रबाबू यांचे आंदोलन चिरडणार?
नव्या तेलंगण राज्या निर्मितीच्या मुद्दावरुन आंध्र प्रदेशात परिस्थिती गंभीर झाली आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन करणारा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय मागे घ्यावा म्हणून उपोषण करणाऱ्या वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वायएस जगनमोहन रेड्डी यांना पोलिसांनी इस्पितळात दाखल केले आहे. तर दुसरीकडे नवी दिल्लीातील आंध्र भवना समोर उपोषणाला बसलेल्या टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांचा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे
Oct 10, 2013, 02:54 PM ISTअण्णांची सोबत मिळाल्यास आंदोलनाची शक्ती वाढेल- केजरीवाल
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे जर आपल्यासोबत आले तर आपल्या आंदोलनाची शक्ती वाढेल, असं आम आदमी पार्टी (आप)चे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
Oct 6, 2013, 10:56 PM ISTमनसे आंदोलनाला परवानगी नाकारली, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. विना परवानगी आंदोलन केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
Oct 4, 2013, 02:25 PM ISTवेगळ्या विदर्भाची मागणी नव्हे… ही तर स्टंटबाजी!
विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यासंबंधी झालेल्या ‘नागपूर करारा’ला आज ६० वर्षे पूर्ण झाली. वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज या कराराची होळी केली.
Sep 28, 2013, 05:20 PM ISTशिवसेनेचं आणखी एक आंदोलन फसण्याच्या बेतात?
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनात फूट पडल्यानं शिवसेनेच्या आंदोलनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अलीकडच्या काळात शिवसेनेची अशी अनेक आंदोलनं फसल्यानं नेमकं पाणी कुठं मुरतंय याचीही चर्चा होऊ लागलीय...
Sep 3, 2013, 07:00 PM ISTमुंडेंची पंकजा पोलिसांच्या ताब्यात!
मुंबईतला सामूहिक बलात्कार आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी भाजपनं पुण्यात जोरदार आंदोलन केलं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यक्रमात निदर्शनं करण्यात आली. आंदोलनानंतर आमदार पंकजा मुंडे-पालवे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Aug 25, 2013, 04:10 PM ISTमाण, खटावच्या चारा छावण्यांवरुन मनसे आक्रमक
साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड यांच्या चारचाकी वाहनाची मनसेच्या चार कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. तोडफोडीच्या निषेधार्थ महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता जिल्हाभर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय.
Aug 12, 2013, 08:10 PM IST