आंदोलन

रिक्षाचालकांचा 21 ऑगस्टपासून राज्यव्यापी संप

राज्यातल्या रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. राज्यभरातले सर्व रिक्षाचालक येत्या २१ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. मुंबईत रिक्षाचालक आणि मालक संघटना कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शरद राव यांच्या नेतृत्वाखाली हा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलाय.

Aug 12, 2013, 07:18 PM IST

हॉट वीणा मलिकनं कर्नाटकातलं वातावरण तापवलं

पाकिस्तानची हॉट अभिनेत्री वीणा मलिक पुन्हा चर्चेत आलीय. तिच्या सीननं भारतातलं वातावरण तापवलंय. सिल्क सक्कत मगा’ या कन्नड चित्रपटातल्या हॉट सीनच्या विरोधात हिंदू संघटना असलेल्या श्रीराम सेनेनं प्रदर्शन करत चित्रपटावर बहिष्कार टाकलाय.

Aug 7, 2013, 11:28 AM IST

मुंबई पालिकेत मनसेचे अनोखे आंदोलन

मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा खड्डयाच्या मुद्याने गाजली. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयाचा प्रश्न घेऊन मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात अनोखे आंदोलन केले.

Aug 6, 2013, 11:53 AM IST

वेगळ्या विदर्भासाठी थेट जंतरमंतरवर...

वेगळ्या विदर्भाची मागणी थेट सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूरमधील सुमारे ५०० ते ७०० आंदोलनकर्ते थेट दिल्लीत दाखल झालेत. जंतरमंतरवर एकत्र येऊन ते वेगळ्या विदर्भाची आज मागणी करणार आहेत.

Aug 5, 2013, 10:27 AM IST

स्वतंत्र विदर्भासाठी `जंतर मंतर`वर आंदोलन!

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते आता आक्रमक झाले आहेत. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 5 ऑगस्टला जंतरमंतर मैदानावर प्रातिनिधिक आंदोलन करण्यात येणार आहे.

Aug 3, 2013, 05:54 PM IST

23 महाविद्यालयांची मान्यता रद्द

23 बीएएमएस महाविद्यालयांची मान्यता रद्द झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयांत हलवण्यात आलेलं नाही. याचविरोधात गेल्या २४ दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. त्यातल्या 5 जणांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. मात्र सरकार अजूनही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

Aug 3, 2013, 01:40 PM IST

स्वतंत्र विदर्भाची मागणी अधिक आक्रमक

तेलंगणा राज्याच्या निर्मिती प्रक्रियेला वेग मिळाला असतानाच आता वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर पकडलाय.. आज नागपूरच्या टेम्पल रोड परिसरात भाजप, शेतकरी संघटना आणि विदर्भवादी नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केले आंदोलन केलं

Jul 30, 2013, 09:03 PM IST

आता सोशल साईट्सवरच्या प्रतिक्रियांचं होणार विश्लेषण!

एचक्यू प्रयोगशाळेमध्ये फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया चॅनेल्सवरील लोकांच्या प्रतिक्रिया तपासून त्यांचे विश्लेषण करण्याचे काम येथे होणार आहे.

Jul 15, 2013, 06:54 PM IST

मेडिकल्स दुपारी २ ते रात्री १० पर्यंतच सुरू...

औषध विक्रेत्यांनी आजपासून आपलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे मेडिकल्स दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत. केमिस्ट एण्ड ड्रगिस्ट असोसिएशननं हा निर्णय घेतलाय.

Jun 24, 2013, 10:51 AM IST

कोल्हापूरमध्ये बस चालकांचं काम बंद आंदोलन!

कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाकडं भाडेतत्वावर असलेल्या बसच्या चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. त्यामुळं प्रवाशांचे हाल होतायत.

Jun 12, 2013, 06:35 PM IST

दुष्काळग्रस्तांना मदत, मनसेचे बिसलेरीविरोधात आंदोलन

राज्याला दुष्काळाचे भयाण चटके बसत असताना बिसलेरीसारख्या पाणी विकणा-या कंपन्या राज्याचेच पाणी वापरुन कोट्यवधी रुपये कमावत आहे.

Apr 25, 2013, 10:29 AM IST

जैतापूर पुन्हा एकदा पेटणार?

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ पुन्हा एकवटलेत. आज प्रकल्पग्रस्तांनी याच मुद्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलीय. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्पस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

Apr 10, 2013, 10:42 AM IST

`अभाविप`ची तोडफोड, उधळली सिनेट बैठक

मुंबईत विद्यापीठांच्या परीक्षांचा घोळ सुरु असताना नागपुरमध्येही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात गोंधळ घातला. आंदोलकांनी विद्यापीठाच्या परिसरातच शर्ट काढून विद्यापीठाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी आणि तोडफोड केली.

Mar 30, 2013, 01:26 PM IST

केमिस्टचे आंदोलन थांबावा `नाहीतर खळ्ळखट्याक`

एफडीएच्या धोरणांविरोधात राज्यातल्या केमिस्टनी पुकारलेल्या आंदोलनाला मनसेनं जोरदार विरोध केलाय. हे आंदोलन मोडून काढण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत.

Feb 21, 2013, 10:42 AM IST

फेरीवाले मुंबईत आंदोलन करणारच...

पोलिसांच्या कारवाईविरोधात फेरीवाल्यांनी २४ तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. आझाद हॉकर्स युनियन आणि इतर सात संघटना शांततेच्या मार्गानं आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.

Jan 22, 2013, 08:48 AM IST