ठाकूर यांच्यापाठोपाठ राम कदमांचीही शरणागती
सूर्यवंशी मारहाण प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्यापाठोपाठ मनसेचे आमदार राम कदम यांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करलीय.
Mar 21, 2013, 11:07 AM ISTमारहाण प्रकरण, आमदार क्षितीज ठाकूर पोलिसांना शरण
वाहतूक शाखेचे एपीआय सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात झालेल्या मारहाण आमदार क्षितीज ठाकूर पोलिसांना शरण आले आहेत.
Mar 21, 2013, 11:06 AM ISTवाद टाळायला हवेत- उद्धव ठाकरे
लोकप्रतिनिधी आणि पोलिसांमधील वाद चुकीचा असून, असे वाद टाळायला हवेत, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. भिवंडीतल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाषण केलं.
Mar 20, 2013, 11:13 PM IST'फौजदारा सूर्यवंशी, तुला आजच खल्लास करतो'
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधान भवनात काही आमदारांनी मारहाण केली. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीत प्रमुख पाच आमदारांविरोधा तक्रार करताना १४ ते १५ आमदार माहणार करीत असल्याचे म्हटले आहे. सूर्यवंशी यांचा जबाब झी २४ तासच्या हाती लागला आहे.
Mar 20, 2013, 08:07 PM ISTनिलंबित आमदारांची अटक आज टळली
क्राइम ब्रांचची टीम विधान भवन परिसरात हजर झाली असून निलंबित आमदारांना अटक करण्यात येणार होती. मात्र आज निलंबित आमदारांची अटक टळली असून राम कदम आणि क्षितिज ठाकूर उद्या स्वतःहून अटक होणार आहेत.
Mar 20, 2013, 07:59 PM ISTमी स्वतःहून अटक होणार- राम कदम
मनसे आमदार राम कदम यांनी आपण स्वतःहून अटक होणार असल्याचं जाहीर केलं आहे. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Mar 20, 2013, 07:29 PM ISTआमदारांचे निलंबन : कोर्टात जाण्याचा सेनेचा इशारा
विधानसभा भवनात जो प्रकार झाला तो समर्थनिय नाही. मात्र, विरोधकांना मारहाणीबाबतचे सीसीटिव्ही फुटेज का दाखविण्यात आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, एका गुन्ह्यासाठी दोन शिक्षा कशा, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
Mar 20, 2013, 05:47 PM ISTमनसे आमदार राम कदमांचे दुसऱ्यांदा निलंबन
मनसे आमदार राम कदम यांचे दुसऱ्यांदा निलंबन होत आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली.
Mar 20, 2013, 04:59 PM ISTआमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Mar 20, 2013, 04:52 PM ISTकुठल्याही क्षणी होणार आमदारांना अटक !
एपीआय सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी ५ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. मरीन लाइन्स पोलिसांनी सूर्यवंशीचा जबाब कोर्टात सादर केला. मुंबई पोलीस जिल्हा कोर्ट नं.८ मध्ये हे स्टेटमेंट सादर केलं आहे.आता कुठल्याही क्षणी राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक होऊ शकते.
Mar 20, 2013, 04:31 PM ISTपोलीस मारहाण : पाच आमदारांचे निलंबन
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.
Mar 20, 2013, 03:21 PM ISTआमदारांची ‘दादा’गिरी!
महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या इतिहासात १९ मार्च २०१३ या हा दिवस काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. महाराष्ट्राच्या विधीमंडळाला नुकतेच ७५ वर्ष पूर्ण होत आहेत.
Mar 20, 2013, 01:51 PM ISTमारहाण प्रकरणी हे आमदार होणार निलंबित?
एपीआय सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध होतो आहे. शिवाय मारहाण करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाईची सर्वपक्षीय मागणी होते आहे.
Mar 20, 2013, 01:01 PM ISTहे लोकप्रतिनिधी की गुंड, मी राजीनामा देणार - सूर्यवंशी
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. त्यामुळे व्यतिथ झालेले सूर्यवंशी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी ते म्हणालेत, मारहाण करणारे आमदार हे लोकप्रतिनिधी आहे की गुंड?
Mar 20, 2013, 12:49 PM ISTपोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल
एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आमदारांनी विधानभवन परिसरातच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी मुंबईत घडला. याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले.
Mar 20, 2013, 12:34 PM IST