Iran-Israel conflict : इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटल आहे. इराणनं इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्त्रायलचं मोठं नुकसान झाल आहे. अनेक इमारतींना आग लागली आहे. इराणच्या हल्ल्यात इस्त्रायलचे सैन्य ठिकाणं नष्ट झाली आहेत. इस्त्रायलचं नेवातिम एअरबेस पूर्णपणे उद्धवस्त झालंय. इराणने जवळपास 150 मिसाईल्स डागल्याचं बोललं जात आहे. मात्र, इस्रायलवर हल्ला करण इराणला चांगलाचं महागात पडू शकते. कारण, इस्रायलने एक Iron Dome विकला तर इराणचा 3 वर्षांचा संरक्षण खर्च भागू शकतो इतके शक्तीशाली क्षेपणास्त्र त्यांच्याकडे आहेत.
Iron Dome हे इस्रायलकडे असलेले सर्वात शक्तीशाली हत्यार आहे. इराणच्या या हल्ल्यानंतर इस्रायलचे 'आयर्न डोम' चर्चेत आले आहे. हवाई दलाच्या संरक्षण यंत्रणेत आयर्न डोम हे ढाल म्हणून काम करते. आयर्न डोमच्या मदतीने इस्रायल शत्रुचे रॉकेट नागरी भागांमध्ये पडण्यापासून रोखते तसेच हे रॉकेट हवेतच नष्ट करते. इस्रायलचे 'आयर्न डोम' हे अँटी मिसाइल म्हणूनही ओळखले जाते.
लेबनॉनमधील 2006 च्या युद्धादरम्यान हिजबुल्लाहने सुरू केलेल्या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने Iron Dome ची निर्मीती केली. हे इस्रायलचे मुख्य शस्त्र बनले आहे. इस्त्रायलजवळ संपूर्ण देशात आयरन डोमच्या जवळपास दहा बॅटरी आहेत. प्रत्येक बॅटरीसोबत एक रडार लावलेले असते. याच्या माध्यमातुन शत्रुने डागलेल्या रॉकेटचा शोध घेतो. कमांड अँन्ड कंट्रोल सिस्टम रॉकेटची दिशा, वेग आणि त्यातून होणारे नुकसान याची माहिती देते. आयरन डोमच्या मदतीने सर्व रॉकेटला उद्ध्वस्त करणे शक्य नाही. मात्र, लोकसंख्या जास्त असलेल्या भागात रॉकेट हवेतचं नष्ट केले जातात. आयर्न डोम हे इस्रायलच्या क्षेपणास्त्र संरक्षणाचा सर्वात खालचा थर असल्याचे मिसाईल डिफेन्स ऑर्गनायझेशन (IMDO) कडून सांगण्यात आले. अधिक उंची, लांब पल्ल्याची, जलद गतीने जाणारी आणि अचूक निशाणा साधणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना लक्ष्य करणारी क्षमता असलेली संरक्षण प्रणाली इस्रायलकडे आहे.
इस्रायलकडे असलेल्या एका आयर्न डोमची किंमत ही इराणच्या संरक्षण बजेटच्या तिप्पट आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या आकडेवार नजर चाकली असता इराणचे संरक्षण बजेट 83,000 कोटी आहे. इस्रायलचे संरक्षण कवच असलेल्या आयर्न डोमची किंमत अंदाजे 3 लाख कोटी रुपये आहे. आकडेवारी पाहिली असता इराण देशाच्या संरक्षणासाठी जेवढा खर्च करत आहे, त्यापेक्षा तिप्पट या शस्त्रास्त्रांची किंमत आहे.
BRN
(20 ov) 209/5
|
VS |
TAN
215/4(19.2 ov)
|
Tanzania beat Bahrain by 6 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.