www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल स्पर्धेमध्ये सट्टेबाजी केल्याच्या आरोपात अडकलेल्या राज कुंद्रा यांना निलंबित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) घेतला. राज कुंद्रा हा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा सहमालक आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राजस्थान रॉयल्स आणि आयपीएलमधील अन्य संघांवर सट्टा खेळल्याचे कुंद्राने मान्य केल्याचे निवेदन दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरजकुमार यांनी दिले होते. या पार्श्वयभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बीसीसीआयच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत राज कुंद्रा यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कुंद्रा आणि त्याची पत्नी अभिनेत्रा शिल्पा शेट्टी यांचे राजस्थान रॉयल्स संघामध्ये ११.७ ट्क्के समभाग आहेत. याशिवाय, राजस्थान रॉयल्स संघामध्ये सुरेश चेलाराम (ट्रेस्को इंटरनॅशनल लिमिटेड) यांचे ४४.२ टक्के मनोज बादले (इमर्जींग मीडीया) यांचे ३२.४ टक्के तर लचलन मर्डोक (ब्ल्यू वॉटर इस्टेट लिमिटेड) यांचे ११.७ टक्के समभाग आहेत.
कुंद्रा याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे संकेत बीसीसीआयने याआधी दिले होते. या प्रकरणात नेमण्यात आलेली चौकशी समिती दिल्ली पोलिसांचा कुंद्रा स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अडकल्याचा दावा कायदेशीर बाबीवर ग्राह्य आहे का नाही, याची चौकशी करणार आहे.
कुंद्रा दोषी आढळल्यास त्यांना जबबदारीमधून मुक्त करण्याच्याही हालचाली चालू झाल्या आहेत. या प्रकरणी कुंद्रा दोषी आढळल्यास त्याच्या कंपनीवरील मालकीवर जप्ती आणण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्स संघाने घेतला आहे.
दरम्यान, स्पॉट फिक्सिंन प्रकरणात राजस्थान रॉयल्स संघाच्या श्रीशांत, अंकित चव्हाण, अजित चंडिला आणि अमित सिंग या चार खेळाडूंना आत्तापर्यंत अटक झाली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.