आसाराम बापूंच्या आश्रमावर हल्ला, भक्तांना मारहाण
राजस्थानच्या जोधपूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपात अडकलेल्या आसाराम बापूंच्या नागपुरातील आश्रमात आज अज्ञात युवकांनी दगडफेक करत तोडफोड केली.
Aug 28, 2013, 08:43 PM ISTआसाराम बापूंना फासावर लटकवा, पीडित मुलीच्या वडिलांची मागणी
आसाराम बापू यांच्याकडून आपल्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचं पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय. या घटनेबद्दल घरी सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला उद्धस्त करण्याची धमकी बापूंनी दिल्याचं ते म्हणाले. शिवाय त्यांच्या शिष्यांकडून केस मागे घेण्याबाबत आपल्यावर दबाव येत असल्याचंही पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय. आसाराम बापूंना अजूनपर्यंत अटक का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Aug 28, 2013, 12:39 PM ISTअटक केल्यास अन्न-पाणी सोडील- आसाराम बापू
माझ्यासोबत दबरदस्ती केली गेली तर, अन्न-पाण्याचा त्याग करील, अशी धमकी आसाराम बापूंनी दिलीय. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले आसाराम बापू सध्या अटकेच्या गर्तेत अडकलेत.
Aug 27, 2013, 10:50 AM ISTगुन्हा कबूल पण सत्य समोर येईलच- आसाराम बापू
अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेले संत आसाराम बापू रविवारी पहिल्यांच सगळ्यांच्या समोर आले. पहासात्मक शैलीत त्यांनी सर्वांसमोर आपल्यावरील आरोप स्विकारले. मात्र लगेचच त्यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचं म्हणत लवकरच सत्य समोर येईल, असंही म्हटलंय.
Aug 26, 2013, 10:06 AM ISTआसाराम बापू संकटात, पोलिसांचं समन्स!
अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा आरोप असलेले आध्यात्मिक गुरू संत आसाराम बापू अधिक संकटात सापडतांना दिसतायेत. जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूंना चौकशीसाठी बोलावलंय.
Aug 26, 2013, 09:24 AM ISTअसा कसा हा `आसाराम`?
आध्यात्मिक गुरु आसाराम बापू पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. आसाराम बापूंच्याविरोधात दिल्लीच्या कमनला नगरमध्ये लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 22, 2013, 07:21 PM ISTअल्पवयीन मुलीवर बलात्कार, `केआरके`चा `बापूं`वर वार!
आसाराम बापूंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असताना अभिनेता कमाल राशिद खान ऊर्फ केआरके याने आसाराम बापूंची टर्र उडवत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 22, 2013, 04:56 PM ISTआसाराम बापूंना होणार अटक!
आध्यात्मिक गुरु आसाराम बापू पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. आसाराम बापूंच्याविरोधात दिल्लीच्या कमनला नगरमध्ये लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोधपूरच्या एका अल्पवयीन मुलीनं आसाराम बापूंविरोधात तक्रार दाखल केलीय. त्यामुळे आसाराम बापूंना अटक होण्याची शक्यता आहे.
Aug 22, 2013, 09:49 AM ISTआसाराम बापू यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा
आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्याविरोधात दिल्लीत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिल्लीतल्या कमला नगरमध्ये राहणाऱ्या जोधपूरच्या एका अल्पवयीन मुलीनं तक्रार केल्यावर, कमला मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ही मुलगी आसाराम बापूंच्या गुरुकुलात शिक्षण घेत होती.
Aug 21, 2013, 12:14 PM IST`देव माझा यार... सरकार-मीडिया भुंकणारे कुत्रे`
स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या आसाराम बापूंनी मीडिया-सरकारचा उल्लेख ‘भुंकणारे कुत्रे’ असा केलाय. एव्हढंच नाही तर, देव आपला ‘यार’ आहे असं सांगणाऱ्या बापूंनी दुष्काळ पडलेल्या ठिकाणी आपण पाऊस पाडून चमत्कार घडवून आणू शकतो, असा दावाही केलाय.
Mar 28, 2013, 02:03 PM ISTबापूंच्या कार्यक्रमांवर बंदी, सरकारचे वराती मागून घोडे
आसाराम बापूंना अखेर राज्य सरकारने दणका दिला आहे. होळी संपेपर्यंत त्यांच्या होळीसंदर्भातील सर्व कार्यक्रमांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी विधीमंडळात यासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र राज्य सरकारची ही कारवाई म्हणजे `वराती मागून घोडे` अशी झाली आहे.
Mar 19, 2013, 07:05 PM ISTमनसे कार्यकर्त्यांनी जाळला आसाराम बापूंचा पुतळा
आसाराम बापूंनी होळीतून केलेल्या पाण्याच्या नासाडीचे आता पडसाद उमटू लागलेत. मुंबईतल्या विलेपार्लेत मनसे कार्यकर्त्यांनी आसाराम बापूंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.
Mar 19, 2013, 05:25 PM ISTमी पाण्याचा सदुपयोग केला- आसाराम बापू
धुळवडीच्या नावाखाली आधी नागपूर आणि आज नवी मुंबई येथे लाखो लिटर पाण्याच्या नासाडी करणाऱ्या आसाराम बापूंनी वेगळीच भूमिका मांडली आहे. आपण पाण्याचा अपव्यय केलाच नाही, असा दावा आसारामबापूंनी केलाय.
Mar 18, 2013, 09:23 PM ISTआसाराम बापूंच्या भक्तांचा मीडियावर हल्ला
नागपूरमध्ये आसाराम बापूंनी लाखो लिटर पाणी वाया घालवत धुळवड साजरी केली होती. या गोष्टीला झी २४ तास ने वाचा फोडल्यावर आसाराम बापूंच्या भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Mar 18, 2013, 04:23 PM ISTआसाराम बापूंना धुळवडीसाठी पाणी देणाऱ्याची चौकशी
राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी करण्यासाठी पाण्याचा अनाठायी वापर केला. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. बापूंना धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरवणा-यांची चौकशी होणार आहे.
Mar 18, 2013, 11:07 AM IST