इमारत कोसळली

आग लागल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत

लुधियानामध्ये औद्योगिक क्षेत्रातील एका इमारतीमध्ये आग लागल्यानंतर ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका अग्निशमन दल कर्मचा-याचा समावेश आहे. तर १५ हून अधिक जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतेय. 

Nov 20, 2017, 10:27 PM IST

इमारतीच्या ढिगाऱ्याखालून त्यानं मोबाईलवरून मित्रांशी संपर्क साधला, पण...

भेंडीबाजार येथे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जाफर हुसेन सय्यद नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीने तब्बल १० तास मृत्युशी झुंज दिली. जाफरनेच मोबाईलवरुन मदत मागितली. मात्र तिथं कोणीच पोहचू न शकल्याने शेवटी गुदमरून जाफर सय्यदचा मृत्यू झाला.

Sep 1, 2017, 07:15 PM IST

मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू

चांदिवली परिसरात असलेल्या सहा मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे काही जण ढिगा-याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे.

Aug 26, 2017, 08:43 PM IST

शितपनं इमारतीचे पिलर्सच कापून टाकले होते, म्हणून...

सुनील शितप या महाभागानं आपल्या नर्सिंग होममध्ये असणारे इमारतीचे पिलर्सच कापून टाकले... आणि १७ जणांचे बळी घेतले... आता शितपला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दुर्घटनेत बचावलेले रहिवासी करत आहेत.

Jul 26, 2017, 01:30 PM IST

जग समजण्याअगोदरच चिमुरड्यानं मिटले डोळे!

घाटकोपरच्या सिद्धीसाई अपार्टमेंटच्या ढिगाऱ्यातून १७ मृतदेह बाहेर आलेत. त्यामध्ये अवघ्या १३ महिन्याच्या क्रिशव डोंगरेचाही समावेश आहे. जग काय असतं हे समजण्याआधीच त्यानं डोळे मिटलेत...

Jul 26, 2017, 12:35 PM IST

घाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री

 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री

Jul 26, 2017, 09:20 AM IST

घाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.  

Jul 25, 2017, 11:25 PM IST

घाटकोपर दुर्घटना : शिवसेनेचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितप याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील शितपने रुग्णालयात केलेल्या अंतर्गत बदलांनामुळे इमारत पडल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय.

Jul 25, 2017, 10:35 PM IST

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२वर, मृतांची नावे पाहा

घाटकोपरच्या चार मजली साई दर्शन इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. इमारत ढिगाऱ्याखालून १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजून आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडलाय. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. त्यामुळं दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.  

Jul 25, 2017, 10:05 PM IST