गोवा

कोकणात पर्यटाकांनी समुद्र किनारे ओसंडलेत

बच्चे कंपनीला उन्हाळ्याची सुट्टी लागलीय. त्यातच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सलग चार दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि गोव्यामधील पर्यटनस्थळी मोठी गर्दी होतेय. 

May 2, 2015, 12:57 PM IST

कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्याला हलविण्यास राणेंचा विरोध

कोकण रेल्वेचे मुख्यालय नवी मुंबईतील बेलापूर येथून थेट मडगाव, गोवा येथे हलविण्यात येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याला कोकणातील नागरिकांचा विरोध आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही तीव्र आक्षेप घेत विरोध केलाय. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना थेट पत्रच पाठविले आहे.

Apr 29, 2015, 03:12 PM IST

गोयंची फेणी, जीवाक बरी!

गोयंची फेणी, जीवाक बरी!

Apr 21, 2015, 08:45 AM IST

शिवसेनेची गोव्यात भाजपविरोधात रणनीती

महाराष्ट्रात भाजपाबरोबर युती असलेली शिवसेना गोव्यात भाजपच्या विरोधात रणनीती आखण्याच्या तयारीला लागली आहे. 

Apr 7, 2015, 02:39 PM IST

फॅब इंडियाला दणका, पोलीस अधिकाऱ्यांचे जबाब घेणार

गोव्यातील फॅब इंडिया शो रुममधील सीसीटीव्ही प्रकरणी आज गोवा पोलीस फॅब इंडियाच्या अधिका-यांचे जबाब घेणार आहेत. 

Apr 7, 2015, 09:57 AM IST

गोवा छुपा कॅमेरा प्रकरण : चौघांची जामिनावर सुटका

गोव्यातल्या फेब इंडिया शोरुम मधल्या छुपा कॅमेरा प्रकरणातल्या चारही आरोपींना म्हापसा कोर्टानं जामीन मंजूर केलाय.

Apr 4, 2015, 11:41 PM IST

गोव्यानंतर कोल्हापुरात फॅब इंडियात डर्टी शुटींग

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं प्रकरण ताजं असतानाच असाच काहीसा प्रकार कोल्हापुरातही घडलाय. कोल्हापुरातल्या ताराबाई पार्क इथल्या फॅब इंडिया शोरुममध्येच हा प्रकार घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Apr 4, 2015, 11:36 PM IST

गोवा : चेंजिंग रुममध्ये कॅमेरा : ४ जणांना अटक, ९ महिलांची चौकशी

गोव्यातील फॅब इंडिया शोरुमच्या चेंजिंग रुममध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आज छुपा कॅमेरा पकडला. याबाबत  गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ जणांना अटक केली असून ९ महिलांची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, संबंधित कॅमेरा सिल करण्यात आला  असून सीआयडी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Apr 3, 2015, 09:12 PM IST

गोव्यात चेंजिग रुममध्ये छुपा कॅमेरा, स्मृती इराणींनी केला भांडाफोड

गोव्यात धक्कादायक बाब उघड झाली आहे. एका कपड्याच्या शोरुममध्ये कपडे बदलण्याच्या रुममध्ये छुपा कॅमेरा लावल्याचे पुढे आलेय. ही बाब केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांना हा धक्कादायक प्रकार दिसला. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

Apr 3, 2015, 04:37 PM IST

'मुलींनो उन्हामध्ये उपोषण नको, काळ्या पडाल'

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप, आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या परिचारिकांनी केला आहे. 

Apr 1, 2015, 04:49 PM IST