मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बॉलिवूडला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. मनसेनं बॉलिवूडला धमकीच दिलीय, जर ते पुढे आले नाही तर त्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईल.
राज ठाकरे यांच्या मनसेच्या चित्रपट सेनेनं बॉलिवूडचे कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांना एक पत्र लिहिलंय. त्यात शेतकरी विशेष करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करायला सांगितलंय. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे.
आणखी वाचा - ...म्हणून मुस्लिम शेतकरी आत्महत्या करत नाही - नाना पाटेकर
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरने हे पत्र पाठवलंय. त्यात लिहिलंय, 'जर मराठी कलाकार नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि बॉलिवूडचे आमीर आणि सलमान खान समाजाच्या मदतीसाठी पुढे येऊ शकतात, तर इतर कलाकार का नाही करू शकत. शेतकऱ्यांची परिस्थिती खूप खराब आहे. फक्त मराठी कलाकारांसाठी शेतकरी धान्य पिकवत नाहीत. म्हणून त्यांचे आभार मानण्याची ही वेळ आहे.'
मनसेनं आपल्या स्टाइलमध्ये कारवाई करण्याची धमकी कलाकारांना दिलीय.
आणखी वाचा - दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचं नानाचं राजकारण्यांना आवाहन
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.