नक्षलवादी

पुण्यात नक्षलवादी झाले सक्रीय

नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या माओवाद्यांचा गट पुण्यामध्ये सक्रीय असल्याची माहिती समोर आलीय.

Mar 30, 2013, 11:15 PM IST

शस्त्रास्त्र फेकून एकमेकांचा हात घेतला हातात...

गडचिरोलीतल्या संतोष कोला आणि शांता कुडियामी यांचा लग्नसोहळा थोडा खास होता... कारण या लग्नसोहळ्याला पार्श्वभूमी आहे त्यांच्या आधीच्या जीवनाची... शस्त्रास्त्र... वरिष्ठांचा दबाव... पोलिसांचा ससेमिरा आणि सातत्यानं मरण्याची भीती... अशा नक्षली वातावरणाशी दोघांचा काही दिवसांपूर्वी संबंध होता.

Feb 5, 2013, 11:38 AM IST

सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झालीय.. यांत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलंय. अहेरीतल्या जिलमगट्टा इथं ही घटना घडली. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

Jan 20, 2013, 08:34 AM IST

धानोरा तालुक्यात नक्षलींचा धिंगाणा

गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात नक्षलींनी बांधकाम ठेकेदाराची २७ वाहनं जाळली. धानोरा तालुक्यातील गोडलवाही भागात रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचं काम सुरु आहे.

Jan 14, 2013, 11:26 AM IST

ऊसदर आंदोलनाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा

शेतक-यांच्या ऊसदर आंदोलनाला आता नक्षलवाद्यांनीही पाठिंबा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतक-यांवर झालेल्या अन्यायाचा नक्षलवाद्यांनी निषेध केला आहे.

Nov 22, 2012, 09:32 AM IST

गडचिरोलीत दहशत नक्षलींची की पोलिसांची?

नक्षलवाद्यांच्या उच्छादामुळे आधीच दहशतीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता लोकशाही धोक्यात आलीय. कोरची या अतिदुर्गम तालुक्यात आज ९० टक्के ग्रामपंचायतीतल्या लोकप्रतिनिधींनी एकाच दिवशी सामूहिक राजीनामे दिल्यानं प्रशासन हादरलंय. याशिवाय एकाच दिवशी ३० पोलीस पाटलांनीही राजीनामे दिलेत.

Jul 12, 2012, 11:17 PM IST

नक्षल्यांचा फतवा, लोकप्रतिनिधींना हटवा

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हत्या आणि इतर जाळपोळीच्या घटनाचे सत्र सुरूच ठेवले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राजीनामे देण्यासाठी दबावाचं धोरण अवंबलंय. आता तर नक्षल्यांनी आणखी आक्रमक होत 'राजीनामे द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा' अशी धमकीच लोकप्रतिनिधींना दिलीय.

May 26, 2012, 11:30 AM IST

नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या छत्तीसगडच्या मानपूर कोहका मार्गावर नक्षल्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. यात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला भूसुरुंगांचा समावेश आहे.

May 26, 2012, 10:28 AM IST

नक्षलींकडून आणखी एक अपहरण...

गडचिरोलीत धानोरा पंचायत समितीचे माजी उपसभापती मेहतसिंग उसेंडी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलंय. धानोरा तालुक्यातल्या मुरूमगावमधून त्यांचं अपहरण करण्यात आलं.

May 20, 2012, 06:28 PM IST

अपहरण केलेल्या सरपंचांची हत्या

इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या केलेल्या सरपंचाचा मृतदेह भंडारा जिल्ह्यात सापडला.

May 10, 2012, 09:21 AM IST

नक्षलवाद्यांनी केलं सरपंचाचं अपहरण

गोंदिया जिल्ह्यातल्या चिचगड तालुक्यातल्या इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलंय. अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. मात्र अजून त्यांचा तपास लागलेला नाही.

May 9, 2012, 07:45 PM IST

नक्षलवाद्यांची अपहरणनीती

शेतमजूर, कष्टकरी,दबल्या पिचलेल्या वर्गाच्या हक्कासाठी पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या खेड्यातून एक चळवळ सुरु झाली....आणि पहाता पहाता ती चळवळ अनेक राज्यात जाऊन पोहोचली. नक्षलबारी - नक्षलवादी असा प्रवास नक्षवादी चळवळीने केलाय.

Apr 26, 2012, 11:45 PM IST

नक्षलवाद्यांनी केलं कलेक्टरचं अपहरण

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अँलेक्स पॉल मेनन यांचे अपहरण करून नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांना आव्हान दिलं आहे. नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्याचं विभाजन करून छत्तीसगड सरकारने नुकताच सुकमा हा नवा जिल्हा निर्माण केला आहे.

Apr 21, 2012, 11:59 PM IST

नेरळमध्ये नक्षलवाद्याचे घर

३ मार्च रोजी डोंबिवलीतून चार नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यातील असीनकुमार भट्टाचार्य याचे नेरळमध्ये घर असल्याचे उघड झालं आहे. या घरातून नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा होत होता.

Mar 9, 2012, 12:18 PM IST

नक्षलवाद्यांकडून भामरागड सभापतींची हत्या

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद्यांनी धुडगूस घातला आहे. भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकारामुळे नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Jan 28, 2012, 11:42 AM IST