नवी दिल्ली

दिल्लीकरांना नववर्षाचं गिफ्ट, तीन महिने पाणी फुकट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत मोफत पाणी पुरवठ्याचं आश्वासन पूर्ण केलंय. १ जानेवारीपासून मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा करून दिल्लीकरांना नवीन वर्षाची भेट दिलीय.

Dec 30, 2013, 06:16 PM IST

आजारी असल्यानं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मारली दांडी!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तापाने फणफणले आहेत तसंच त्यांना डायरिया झाला असल्यानं ते आज कार्यालयात जाऊ शकणार नाहीत. केजरीवाल यांनी ट्विट करुन ही माहिती दिलीय.

Dec 30, 2013, 11:14 AM IST

येत्या शनिवारी केजरीवाल घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

आम आदमी पार्टी (आप) चे संयोजक अरविंद केजरीवाल दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री म्हणून २८ डिसेंबरला शपथ घेतील. शनिवारी दुपारी १२ वाजता केजरीवाल हे रामलीला मैदानात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

Dec 25, 2013, 02:47 PM IST

समलैंगिक संबंधप्रकरणी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका

समलैंगिक संबंध प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केलीय.. सरकारनं कलम ३७७ विषयी पुनर्विचार करण्याची ही याचिका दाखल केलीय. या कलमानुसार सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंध गुन्हा ठरवला होता.. यावर काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

Dec 20, 2013, 04:00 PM IST

लोकपाल विधेयकाबाबत अण्णा ‘संतुष्ट’ तर केजरीवाल ‘रूष्ट’!

लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला समाजाच्या विविध थरातून पाठींबा मिळतोय. त्यातच लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी आज काँग्रेसनं प्राधान्य असल्याचं जाहीर केल्यावर अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालावर आपण समाधानी असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभेत लोकपाल संमत झाल्यास आपण उपोषण सोडू असं अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केलंय.

Dec 14, 2013, 09:08 PM IST

केजरीवाल यांना हवेत १० दिवस, सत्तेसाठी जनतेशी संवाद

दिल्लीत आम आदमीचे सरकार येणार की नाही माहित नाही. मात्र, आपने उपराज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली. आम्हाला दहा दिवसांची मुदत द्या, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यामुळे केजरीवाल काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Dec 14, 2013, 11:47 AM IST

दिल्लीतील हल्ल्याचा कट उधळला, लष्करचा हस्तक अटकेत

दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा डाव पोलिसांनी शुक्रवारी हाणून पाडला. लष्कर ए तयबाचा सदस्य मोहम्मद शाहिद याला पोलिसांनी अटक केली. त्याकडून महत्वाची माहिती हाती आली आहे.

Dec 14, 2013, 11:32 AM IST

समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणं निराशाजनक - सोनिया गांधी

समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणं निराशाजनक असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी सर्वोच्य न्यायलयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

Dec 12, 2013, 03:00 PM IST

समलैंगिक संबंधाना कायदेशीर मान्यतेनंतर आज फैसला

समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला होता. त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्याबाबत आता अंतिम फैसला येणार असून, समलैंगिक संबंधांना सुप्रीम कोर्टही शिक्कामोर्तब करणार का, याकडं सगळ्यांच्या नजरा लागल्यात.

Dec 11, 2013, 10:33 AM IST

‘आप’ आणि ‘भाजप’नं एकत्र यावं- किरण बेदी

दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टी सत्ता स्थापण्या ऐवजी विरोधी बाकांवर बसण्यास पसंती देत असताना किरण बेदींनी मात्र दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची सूचना केलीय.

Dec 9, 2013, 02:52 PM IST

दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेशात भाजपचीच जादू

दिल्ली आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता खेचून आणली आहे. या आधीच्या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. तर मध्य प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत राहण्याचा मान भाजपने पटकावला आहे.

Dec 8, 2013, 12:15 PM IST

केजरीवालांच्या `झाडू`नं केला दिल्लीत `काँग्रेसचा सफाया`

दिल्ली निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमीने मोठी झेप मारत अनेक वर्षे दिल्लीच्या सत्तेत राहणाऱ्या काँग्रेचा सफाया केलाय. मुख्य म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव अरविंद केजरीवाल करणार हे निश्चित झाले आहे. केजरीवाल यांनी ५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

Dec 8, 2013, 11:24 AM IST

एडवर्ड स्नोडेन दिल्लीतच शिकला कॉम्प्युटर हॅकिंग

अमेरिकेच्या ‘प्रिज्म’ या हेरगिरीची प्रकल्पाचा भंडाफोड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेननं कॉम्प्युटर हँकिंगचं तंत्रशुद्ध ज्ञान नवी दिल्लीतच घेतलंय. दिल्लीच्या कोइंग सोल्यूशन या इन्स्टिट्यूटमधून स्नोडेननं हे शिक्षण घेतलंय. या इन्स्टिट्यूटनंच ही माहिती प्रसिद्ध केलीय.

Dec 5, 2013, 11:49 AM IST

ऊस दराचं गुऱ्हाळही पोहचलं दिल्लीत, उत्तर नाहीच!

ऊस दराच्या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

Nov 26, 2013, 07:51 PM IST

महाराष्ट्र भवनात मराठी कलाकारांचाच अपमान

दिल्लीत मराठी माणसांसाठी बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात आता अमराठी अधिकाऱ्यांची मुजोरी सुरु झालीय. याचा फटका दिल्लीत राहणाऱ्या आणि महाराष्ट्र सदनात कार्यक्रम करु इच्छिणाऱ्या कलावंतानाच सहन करावा लागतोय.

Nov 24, 2013, 03:48 PM IST