निधन

भाजपाचे जेष्ठ नेते रामभाऊ कापसे यांचं निधन

भाजपाचे जेष्ठ नेते आणि एक उत्तम संसदपटू असलेले रामभाऊ कापसे यांचं आज पहाटे 4 वाजता निधन झालं. वयाच्या 82 व्या वर्षी कल्याणमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 11 वाजता रामभाऊंची अंत्ययात्रा निघणार आहे.

Sep 29, 2015, 09:03 AM IST

नरेंद्र मोदींच्या अध्यात्मिक गुरूंचं निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अध्यात्मिक गुरू स्वामी दयानंद गिरी यांचं निधन झालं आहे. बुधवारी आश्रमात दीर्घकालीन आजाराने त्याचं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते.

Sep 24, 2015, 08:57 AM IST

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं निधन

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईत प्रदिर्घ आजारानं निधन झालं. कर्करोगानं ते आजारी होते. 

Sep 5, 2015, 09:41 AM IST

दिल्ली-मुंबईला हिरोशिमा-नागासाकी बनविण्याची धमकी देणाऱ्याचा मृत्यू

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISIचे माजी चीफ रिटार्यड जनरल हामिद गुलचं आज सकाळी निधन झालं. ६ ऑगस्टला त्यांच्या नावानं असलेल्या ट्विटर अकाउंटवरून दिल्ली-मुंबईला हिरोशिमा-नागासाकी बनविण्याची धमकी दिली गेली होती. गुलला मुरेच्या कंबाइंड मिलिट्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Aug 16, 2015, 05:08 PM IST

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं निधन

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं निधन

Aug 11, 2015, 01:35 PM IST

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. संगीत नाटकांच्या काळात पेंढाकरांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली होती. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Aug 11, 2015, 09:20 AM IST

जिथं डॉ. कलाम जेवायचे त्या हॉटेलमध्ये आता त्यांच्या नावानं थाळी

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना खाण्याची खूप आवड होती. ते शाकाहारी होते आणि साधं-सात्विक भोजन त्यांना आवडायचं. डॉ. कलाम जेव्हा केरळला जायचे तेव्हा तिरुवनंतपुरमच्या एका खास हॉटेलमध्येच जेवायचे.

Jul 29, 2015, 07:04 PM IST

'मिसाईल मॅन'च्या काही आठवणी

'मिसाईल मॅन'च्या काही आठवणी

Jul 28, 2015, 02:13 PM IST

ज्येष्ठ दलित नेते रा.सू.गवई यांचं निधन

ज्येष्ठ दलित नेते रा.सू.गवई यांचं निधन झालं आहे. प्रदीर्घ आजारात रा.सू.गवई यांचं निधन झालं. 

Jul 25, 2015, 03:03 PM IST

उर्दू कवितेचं नुकसान, शायर बशर नवाज यांचं निधन

'करोगे याद तो हर बात याद आयेगी...' सारखी अजरामर गजल आणि हृदयाचा ठाव घेणारे शेर शब्दबद्ध करणारे ख्यातनाम शायर बशर नवाज यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. 

Jul 9, 2015, 09:23 PM IST

जगातील सर्वात वयोवृद्ध साकारी मोमोई यांचं निधन

जपानमधील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या साकारी मोमोई यांचं मंगळवारी वयाच्या ११२ व्या वर्षी निधन झालं. 

Jul 8, 2015, 05:55 PM IST

'सचिन ट्रॅव्हल्स'चे मालक सचिन जकातदार यांचं निधन

 'सचिन ट्रॅव्हल्स'चे मालक सचिन जकातदार यांचं आज निधन झालं. जे जे रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचं निधन झालं. न्यायालीन कोठडीत असलेल्या सचिन जकादार यांना तीन महिन्यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. 

Jul 8, 2015, 04:54 PM IST