पाकिस्तान

पाकिस्तानी मदरशातून बंदिस्त मुलांची सुटका

पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं ही गोष्ट पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. कराची येथील एका इस्लामी मदरशाच्या तळघरात ५० हून अधिक मुलं व तरुण साखळदंडांनी बांधून ठेवले असल्याचं आढळून आलं.

Dec 13, 2011, 03:38 PM IST

अमेरिकेने पाकचा मदत निधी गोठवला

अमेरिका आणि पाकिस्तान दरम्यान ताणलेले संबंध आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे. अमेरिकन सिनेटने पाकिस्तानला देण्यात येणारी ७०० दशलक्ष डॉलर्सचे सहाय्य गोठवलं आहे.

Dec 13, 2011, 03:38 PM IST

झरदारींच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव

पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांना मेंदूमध्ये रक्तस्त्राव सुरू झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

Dec 10, 2011, 11:36 AM IST

झरदारी यांची प्रकृती स्थिर

पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Dec 8, 2011, 08:10 AM IST

पाकचे राष्ट्रपती हॉस्पीटलमध्ये

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी अचानक आजारी पडले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने दुबईतील एका हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

Dec 7, 2011, 12:19 PM IST

लादेनचं कुटुंब होणार सौदीला स्थायिक

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर, पाकिस्तानातच असणा-या त्याच्या कुटुंबीयांनी सौदी अरेबियात राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत लादेन कुटुंबीय सौदीकडे रवाना होण्याची शक्यता असून, पाकिस्तान सरकारने हा निर्णय गोपनीय ठेवला आहे.

Dec 7, 2011, 07:28 AM IST

पाकच्या बडग्यासमोर अमेरिका नमली

नाटोने केलेल्या हवाई हल्ल्यात २४ पाक सैनिक मारले गेल्यानंतर पाकिस्तानी सरकारने अमेरिकेला हवाईतळ रिकामा करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकन नागरिकांना परत नेण्यासाठी अमेरिकन विमान कडेकोट बंदोबस्तात शम्सी हवाई तळावर उतल्याचं वृत्त वाहिन्यांनी दिलं आहे.

Dec 4, 2011, 01:39 PM IST

पाकची अमेरिकेला ताकीद

पाकिस्तानने आता आपला हक्क गाजवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. कारण की पाकिस्तानने शम्सी एअरबेस सोडण्याची अमेरिकेला ताकीद दिली आहे.

Nov 27, 2011, 04:48 PM IST

झरदारींची कामगिरी उजवी- स्टीफन कोहेन

दहशतवादाच्या भस्मासूराने थैमान घातलेल्या पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली जरदारी यांची कामगिरी आजवरच्या सरकारांमध्ये तुलनेत उजवी ठरली आहे असं मत एका अमेरिकन तज्ञाने व्यक्त केलं. असिफ अली जरदारींनी कमकुवत झालेल्या घटनात्मक संस्थांच्या पुर्नउभारणीचे प्रयत्न केल्याचंही मत या तज्ञाने व्यक्त केलं.

Nov 25, 2011, 02:15 PM IST

पाक २६/११ च्या दोषींना देण्यास तयार होतं

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारींची भीतीने गाळण उडाली होती. त्यामुळेच मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या दोषींना भारताच्या हवाली करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. यात हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्यांनाही भारताच्या सुपूर्द करण्याची त्यांची तयारी होती. तसंच अमेरिकेला अनुकूल असलेली नवी सुरक्षा टीम स्थापण्यास झरदारी तयार होते.

Nov 18, 2011, 01:04 PM IST

अमेरिकेच्या हल्ल्यात सात दहशतवादी ठार

पाकिस्तानच्या वायव्य सीमेवर असलेल्या अदिवासी भागात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात, सात संशयित दहशतवादी ठार झालेत.

Nov 15, 2011, 10:36 AM IST

'आंधळेपणाने विश्वास टाकता येणार नाही'- पीएम

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कधी नव्हे ते पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना चांगलेच खडसावले आहे. त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत गिलानी यांचा समाचार घेतला आहे. 'आंधळेपणाने विश्वास टाकता येणार नाही' अशा भाषेत 'गिलानी' यांना भारत आता कोणाताही 'गलथानपणा' करणार नाही हेच स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

Nov 13, 2011, 05:16 AM IST

पाकिस्तानचं शहाणपण, कसाबला फाशी द्या!

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाबला फाशी द्यायला हवी, असं विधान पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी केलंय.

Nov 10, 2011, 06:23 AM IST

भारत-पाकमध्ये विश्वास दृढ - परराष्ट्रमंत्री

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी पाकिस्तानबद्दलचा विश्वास वाढत असल्याचे वक्तव्य केलंय.

Nov 9, 2011, 11:16 AM IST

पाकिस्ताननंतर चीनची घुसखोरी !

पाकिस्तानने कारगिलमध्ये ज्या पद्धतीने घुसखोरी केली होती, तशाच प्रकारची घुसखोरी चीनही करू शकतो, असा इशारा 'इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ऍनॅलिसिस' (आयडीएसए) या संस्थेने दिला आहे.

Nov 5, 2011, 01:23 PM IST