भारत

कॉमनवेल्थ : भारतीय शूटर्सचा सुवर्णवेध धडाका कायम , 25 मेडल

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय शूटर्सचा सुवर्णवेध घेण्याचा धडाका कायम आहे. 50 मीटर पिस्तल प्रकारात भारताने गोल्ड आणि सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय. जितू रायने 194.1 पॉईंट्स कमाई तर केलीच याचबरोबर नव्या कॉमनवेल्थ रेकॉर्डसची नोंदही केली. याखेरीज गुरपाल सिंगने सिल्व्हर मेडलवर नाव कोरत शुटींगमधील भारताचा दबदबा कायम राखला. भारतीय प्लेअर्सच्या दमदार कामगिरीमुळे भारताने 25 मेडल्स मिळवत टॅलीमध्येही चौथ्या स्थानी झेप घेतलीय.

Jul 29, 2014, 08:01 AM IST

धक्कादायक: भारतात दर अर्धा तासाला एक बलात्कार

भारतात दर अर्ध्या तासाला एक बलात्काराची घटना घडते अशी लाजीरवाणी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या १३ वर्षात भारतात तब्बल २ लाख ७२ हजार ८४४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून २००१ च्या तुलनेत २०१३ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल ५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Jul 28, 2014, 10:41 AM IST

पहिल्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व

 इंग्लंडच्या कर्णधार कूकचं शतक 5 धावांनी हुकलं. तर गॅरी बॅलन्सने मालिकेतील दुसरं शतक साजरं केलं. 

Jul 27, 2014, 11:27 PM IST

कॉमनवेल्थ 2014: राहीला गोल्ड मेडल, एकूण 15 मेडलची कमाई

कॉमनवेल्थमध्ये आज तिसऱ्या दिवशी भारताने सुरुवातीला सिल्वर मेडलची कमाई केली. त्यानंतर दोन गोल्ड आणि दोन सिल्वर मेडल मिळवत भारताने 15 मेडल मिळवताना पदतालिकेत पुन्हा चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत  5 गोल्ड, 7 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.

Jul 26, 2014, 05:32 PM IST

'ग्लासगो' कॉमनवेल्थमध्ये आज...

कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज तिसऱ्या दिवशी भारत कुठल्या इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे, त्यावर एक नजर टाकुयात...   

Jul 26, 2014, 10:54 AM IST

'भारत हिंदू राष्ट्रच; बनविण्याची गरज नाही'

गोव्याच्या मंत्र्यांना झालंय तरी काय? असा प्रश्न आता तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. कारण, वादग्रस्त वक्तव्यं करण्याची अनोखी स्पर्धाच जणू गोव्याच्या मंत्र्यांमध्ये लागलीय.

Jul 26, 2014, 10:21 AM IST

कॉमनवेल्थ 2014: भारताला आणखी एक गोल्ड, सिल्वर, ब्राँझ मेडल

दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताच्या अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल पटकाविले. भारताने दहा मेडल मिळवताना पदतालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत (दुसरा दिवस) 3 गोल्ड, 4 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.

Jul 25, 2014, 08:13 PM IST

कॉमनवेल्थ : भारताची सात मेडलची कमाई, दोन गोल्ड

'ग्लासगो कॉमनवेल्थ'मध्ये भारताच्या अॅथलिस्टनं तब्बल सात मेडल्स मिळवत भारतीयांना सुखद धक्का दिलाय. यामध्ये, दोन गोल्ड, तीन सिल्व्हर तर दोन ब्राँझ पदकाचा समावेश आहे.   

Jul 24, 2014, 11:02 PM IST

मुंबई पुन्हा हादरली, महिलेवर धावत्या कारमध्ये गँगरेप

दिल्र्लीतील निर्भया गँगरेप प्रकरण आणि मुंबईतील शक्तीमिल कंपाऊंड गँगरेप प्रकरण ताजं असतांनाच पुन्हा एकदा देशाची आर्थिक राजधानी हादरलीय. मुंबईत पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका ४० वर्षीयवर महिलेवर कारमध्ये बलात्कार करण्यात आलाय. 

Jul 24, 2014, 01:50 PM IST

लॉर्ड्स टेस्ट जिंकण्याची तेंडुलकरने केली होती भविष्यवाणी

 भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने भारत लॉर्ड्स टेस्ट जिंकणार असल्याची भविष्यवाणी केली होती. सचिनने या संदर्भात सांगितले की, मी भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावरच सांगितले.

Jul 23, 2014, 04:08 PM IST