भारत

स्वच्छ भारताचा ध्यास, महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य

भारत साकारण्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाला या स्वच्छतेच्या मोहिमेशी जोडण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत अभियानाची आज गांधी जयंतीच्या निमित्ताने सुरुवात केली. आज राष्ट्रपीता महात्मा गांधींजींची जयंती, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहीली.

Oct 2, 2014, 08:53 AM IST

‘केम छो…’ म्हणत ओबामांनी केलं मोदींचं स्वागत!

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट पार पडलीय. यममानपदी असलेल्या बराक ओबामांनी ‘केम छो मिस्टर प्राईम मिनिस्टर’ असं संबोधत मोदींचं हसतमुखानं स्वागत केलं. 

Sep 30, 2014, 10:09 AM IST

दिवाळीत पुन्हा परतणार जिओमीचा Mi3

जिओमीनं जेव्हा भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन रेडमी १एस बाजारात लॉन्च केला. तेव्हा Mi3ची विक्री बंद केली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार लवकरच Mi3ची भारतात विक्री सुरू होणार आहे. शुक्रवारी बंगळुरूमध्ये आयोजित प्रेस कॉन्फरन्समध्ये कंपनीचे हेड मनु जैन यांनी याबद्दल माहिती दिली.  

Sep 28, 2014, 05:18 PM IST

मोदींच्या दणक्यानंतर पाकिस्ताननं मानली स्वत:ची चूक

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दहशवादाच्या सावटाखाली पाकशी चर्चा करता येणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला सुनावल्यानंतर पाकनं अखेरीस नमती भूमिका घेतली आहे. भारत - पाकमधील सचिव स्तराची बैठक होत असतानाच काश्मीरमधील हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करण्याची वेळ चुकलीच अशी कबुली पाकिस्तानचे सुरक्षा आणि परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे. 

Sep 28, 2014, 04:39 PM IST

करीनाचा झिरो फिगर आणि झिरो जीके…

भारताच्या 'मंगळयान' मोहिमेच्या यशाची संपूर्ण जगात चर्चा होतेय. अमिताभ बच्चन, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनंही या भारताच्या या यशाचं कौतुक केलंय. पण, 'मंगळयान' मोहमेचा गंधही नसलेलेही काही लोक आहेत... त्यापैंकीच एक आहे बेगम करीना कपूर खान...

Sep 27, 2014, 07:46 PM IST

एशियन गेम्स : भारताला दुसरे सुवर्ण पदक, तिरंदाजीत यश

 एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुरुष सांघिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. भारतीय संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा 227-224 असा पराभव केला.

Sep 27, 2014, 02:39 PM IST

भारताच्या मंगळयानाने पाठविले पाच फोटो, इस्त्रोकडून एक फोटो जारी

भारताच्या मंगळयानाने आपल्या कॅमेऱ्यातून मंगळ ग्रहाची पाच छायाचित्र पाठविली आहेत. या  हाय डेफिनेशन फोटोत लाल भडक ग्रह नजरेत भरत आहे. ही छायाचित्र इस्त्रो लवकर प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील एक फोटो इस्त्रोने ट्विटर अपलो़ड केलाय.

Sep 25, 2014, 11:07 AM IST

मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर

24 तारखेनंतर भारताचा मंगळयान मंगळाच्या कक्षेत घिरट्या घालू लागेल आणि याच वेळी तो मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर पाठवू लागेल. मंगळयान मंगळाच्या कक्षेत काय करेल आणि कशा प्रकारे ही माहिती आपल्याकडे  पाठवेल याबाबतचा एक खास रिपोर्ट.

Sep 24, 2014, 07:37 AM IST

आयफोन-६ १७ ऑक्टोबरपर्यंत भारतात विक्रीसाठी उपलब्ध

आयफोन-६ हा फोन १७ ऑक्टोबरपर्यंत भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, तीन दिवसात तब्बल एक कोटी फोनची विक्री झाली. ही विक्रमी विक्री असल्याचे सांगतले जात आहे.

Sep 23, 2014, 07:48 AM IST

काश्मीर हा पाकिस्तानचा भाग, इंच इंच जमीन आणणार - बिलावल

पाकिस्तान पिपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो याने नविन वाद उभा केलाय. भारतातील काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे. काश्मीरमधील एक एक इंच जमीन पुन्हा मिळविली जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य केलेय.

Sep 20, 2014, 04:02 PM IST

अखेर चीन सैन्याची सीमेवरुन माघार

भारत-चीन सीमेवर उत्तर-पूर्व लडाखमधील चुमुर भागात घुसखोरी करणा-या चिनी सैनिकांनी माघार घेतल्याची माहीती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सीमेवर निर्माण झालेला तणाव काहीसा निवळताना दिसतोय.

Sep 19, 2014, 07:09 PM IST