मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठातील काही अभ्यासक्रमाचे निकाल आणखी रखडणार

राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाचे निकाल ३१ जुलैला लावण्याचे निर्देश दिले असले, तरी हे निकाल रखण्याचीच चिन्ह आहेत.

Jul 28, 2017, 06:12 PM IST

मुंबईतील महाविद्यालये आता ३१ जुलैपर्यंत बंद

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन असेसमेंट दिरंगाईचा फटका पुन्हा एकदा मुंबईतील ७४० महाविद्यालयांना बसणारेय. गेल्या चार दिवसापासून बंद ठेवण्यात आलेली मुंबईतील महाविद्यालये आता ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. 

Jul 27, 2017, 07:55 PM IST

'३१ जुलैला पेपर तपासणी पूर्ण करू'

मुंबई विद्यापीठातल्या पेपर तपासणी घोळाप्रकरणी विधान परिषदेत बोलताना शिक्षणमंत्री तावडेंनी ३१ जुलैला पेपर तपासणी पूर्ण करू असं सांगितलं.

Jul 26, 2017, 04:35 PM IST

३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करा - राज्यपाल

मुंबई विद्यापीठातील पेपर तपासणीबाबत राज्यपालांना आढावा घेतलाय. येत्या 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करा, असा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुखांना दिलाय.  

Jul 24, 2017, 07:22 PM IST

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची गच्छंती अटळ

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची गच्छंती अटळ दिसते आहे.

Jul 24, 2017, 04:00 PM IST

विनोद तावडे आणि कुलगुरु संजय देशमुखांचे राजीनामे घ्या- आदित्य ठाकरे

शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांचे राजीनामे घ्या अशी मागणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. विद्यापीठातील कारभारासंदर्भात ही भेट होती. यावेळी आदित्य यांच्यासह आमदार अनिल परब, नगरसेवक अमेय घोले हे उपस्थित होते. ऑनलाइन असेसमेंटसाठी 4 दिवस कॉलेजेस बंद ठेवणं हा निर्णय दु्र्दैवी असल्याचं आदित्यने म्हटलं आहे. 

Jul 24, 2017, 01:38 PM IST

मुंबई विद्यापीठाची पेपर तपासण्यासाठी अजब शक्कल

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं आता विद्यार्थ्यांचा अभ्यासाचं नुकसान होऊ लागलं आहे. विद्यापीठानं आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आजपासून सलग चार दिवस सुटी दिली आहे. आणि सुटीचं कारण ऐकून तुम्ही कपाळावर हात मारला नाही तरच नवल. प्राध्यापकांना पेपर तपासण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन तपासणीतल्या घोळामुळे आता चार दिवस मुंबई विद्यापीठाच्या सर्वच कॉलेजमध्ये ही अध्ययन सुटी देण्यात आली आहे.

Jul 24, 2017, 09:46 AM IST

मुंबई विद्यापीठाच्या मदतीला नागपूर विद्यापीठ आले धावून

मुंबई विद्यापीठात पेपर तपासणी रखडल्यामुळे निकाल वेळेत लागलेले नाहीत. त्यामुळे अखेर आता मुंबई विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाची मदत घेतलीय. 

Jul 21, 2017, 07:24 PM IST

'संघर्षाला हवी साथ', आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

संघर्षाला हवी साथ या झी 24 तासनं सुरू केलेल्या विशेष उपक्रमाची यशस्वी सांगता आज विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यानं मुंबईत होणार आहे. घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर आणि अडचणींवर मात करत, दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणा-या 20 गरजू गुणवंतांच्या संघर्षकहाण्या आम्ही गेले महिनाभर आपणाला दाखवल्या. त्यांच्या संघर्षाला मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्राच्या दातृत्वाला आम्ही आवाहन केलं. त्यानुसार केवळ महाराष्ट्र किंवा देशातूनच नव्हे तर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला.

Jul 20, 2017, 09:21 AM IST

मुंबई विद्यापीठाच्या घोळावर आदित्य ठाकरेंची टीका

कारण ते विद्यार्थ्यांचं ऐकायचे आणि त्यांना कुलगुरू भेटायचे. मात्र आता राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागतोय. 

Jul 8, 2017, 08:48 PM IST