मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maratha Reservation : मुख्यमंत्री म्हणतात, टिकणारं आरक्षण देऊ...; 'सरसकट' शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम!

Maratha Reservation : मी परवा जरांगे यांच्याशी बोललो होतो. त्यांना मी सांगितलं होतं की टिकणारं, कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कुणबी नोंदी सापडताहेत त्यांना तपासून आपण लगेच प्रमाणपत्र देणे सुरु केले आहे, असं मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत.  मात्र, सरसकट शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 2, 2023, 10:41 PM IST
Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange PT1M57S

Maratha Reservation | सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार

Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange

Nov 2, 2023, 12:40 PM IST

'मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या', मनोज जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या, असं सांगताना जरांगे यांचे डोळे पाणावले.

Oct 30, 2023, 02:09 PM IST

'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

Maratha Reservation : दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असं सांगत मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत. 

Oct 24, 2023, 09:47 PM IST

Dasara Melava : 'शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार', एकनाथ शिंदे यांचं आश्वासन!

Eknath Shinde On Maratha Reservation : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली अन् मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं आहे.

Oct 24, 2023, 09:10 PM IST

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा

Maratha Reservation : आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. दरम्यान, जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली.

Oct 20, 2023, 02:32 PM IST

आमदार अपात्रता प्रकरण, 'या' तारखेला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी आता 30 ऑक्टोबरला होणार आहे.  विधानसभा अध्यक्षांना  वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी आहे. 

 

Oct 17, 2023, 02:44 PM IST

सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला मोठा निर्णय

कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भेटीतून मुख्यमंत्र्यांची महात्मा गांधी यांना स्वच्छांजली वाहिली. 

Oct 2, 2023, 11:24 PM IST

मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा

CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Sep 16, 2023, 02:18 PM IST

ना मंत्रालय, ना वशिला; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविण्यासाठी थेट करा अर्ज!

Application For CM Relief Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे.

Sep 10, 2023, 11:59 PM IST

'ट्विन टनेल' फोडणार मुंबईतील वाहतूक कोंडी; मुख्यमंत्र्यांकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईत 'ट्विन टनेल'  उभारणार. मुंबईचा आर्थिक कायापालट करण्यासाठी नीति आयोग मांडणार विकासाची ब्ल्यू प्रिंट.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली. 

Aug 29, 2023, 09:47 PM IST

'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Aug 25, 2023, 07:31 AM IST

तयारीला लागा! मुंबईत 'या' तारखेला होणार प्रो दहीहंडी स्पर्धा; पहिले बक्षिस 11 लाखांचे

शिंदे-फडवणीस सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला होता. यानंतर प्रो कबड्डी प्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. 

Aug 19, 2023, 06:31 PM IST

'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी  आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं. 

Aug 15, 2023, 07:02 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर झळकले. फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकलेले ते महाराष्ट्रातले पहिले नेते ठरले आहेत. शिंदे गटातील नेते राहुल कनाल यांच्यावतीनं हा उपक्रम राबविण्यात आला. राहुल कनाल यांनी काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकले आहेत. राहुल कनाल यांच्या मुंबा फाऊंडेशनच्या वतीने ही जाहिरात देण्यात आली होती. 

Aug 5, 2023, 11:27 AM IST