मृत्यू

महालक्ष्मीला निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात

कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. भाविकांची स्कॉर्पिओ गाडी रोडरोलरला धडकून भीषण अपघात घडला. कोल्हापुरातल्या शिरोळीजवळ हा अपघात घडला. अपघातात ४ जण जागीच ठार झालेत तर ५ जण जखमी आहेत.

Sep 17, 2013, 12:37 PM IST

‘डॉल्बी’चा आवाज हरपला!

कॉर्डेड आवाजावर नियंत्रण मिळवून हाच आवाज श्रवणीय बनवून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणाऱ्या ‘डॉल्बी’ या ध्वनीमुद्रण प्रणालीचे जन रे डॉल्बी यांचं सॅनफ्रान्सिस्को इथं गुरुवारी निधन झालंय. ते ८८ वर्षाचे होते.

Sep 14, 2013, 02:24 PM IST

वर्धा जिल्ह्यात डेंग्यूची साथ,५२ जणांना लागण!

ऐन सणात वर्ध्यात डेंग्यूच्या साथीनं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात तापानं दोन मुलांचा बळी घेतला तर आतापर्यंत २६१ जणांच्या केलेल्या रक्त तपासणीत ५४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. यातील सात रुग्ण जे जिल्ह्याबाहेरील असल्याची महिती आहे.

Sep 11, 2013, 01:07 PM IST

आसाराम बापूंचा साधक बेपत्ता!

अमित चितळे गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. अमित हा आसाराम बापूंचा साधक म्हणून काम करत होता. २९ मे २०१३ रोजी अमितचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलंय. मात्र त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यामुळं अमितच्या गायब होण्यामुळं गूढ निर्माण झालंय.

Sep 8, 2013, 01:29 PM IST

दहीहंडी पाहायला निघालेल्या गोविंदाचा मृत्यू

आज मुंबईत दहीहंडीदरम्यान विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दहीहंडीसाठी निघालेल्या एका गोविंदाचा मोटर सायकल अपघातात मृत्यू झाला आहे. संकेत सिद्धार्थ मोहिते असं या तरुणाचं नाव आहे.

Aug 29, 2013, 11:31 PM IST

मला माझा मृत्यू दिसलाय – टायसन

खलनायक ठरलेला माजी मुष्टियोद्धा माईक टायसन एका वेगळ्याच कारणाने त्रस्त आहे. त्यांने आपले मरण पाहिले आहे. मला माझा मृत्यू दिसत असल्याचे त्याने म्हटले आहे. हा मृत्यू दारू आणि अमली पदार्थामुळे जवळ आल्याचे त्यांने नमुद केले आहे.

Aug 27, 2013, 08:47 AM IST

सोळा वर्षीय तरुणीचा अंधश्रद्धेतून बळी

अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर लढा देणा-या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनं सारा महाराष्ट्र सुन्न झालाय. त्याचवेळी नागपुरात एका सोळा वर्षांच्या तरुणीचा अंधश्रद्धेमुळं बळी गेलाय. कोणालाही संताप येईल अशी ही घटना.

Aug 21, 2013, 11:22 PM IST

‘राज्यराणी’ एक्स्प्रेसनं प्रवाशांना उडवलं

बिहारमधील सहरसा जवळील धमारा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ‘राज्यराणी’ एक्स्प्रेसखाली येऊन भीषण अपघातात ३५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Aug 19, 2013, 10:53 AM IST

दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा मृत्यू

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू साथीदार आणि मुंबईमधील १९९३ च्या बॉंबस्फोटांमधील प्रमुख आरोपी इक्बावल मिर्ची याचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिर्चीचा लंडनमधे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Aug 15, 2013, 03:09 PM IST

श्रीदेवी वेगवेगळ्या अदांमध्ये

श्रीदेवी वेगवेगळ्या अदांमध्ये

Aug 14, 2013, 12:56 PM IST

लोकलमधील स्टंटबाजी बेतली जीवावर!

लोकल ट्रेनमध्ये मोहसीन ट्रेनच्या दरवाजात लटकत होता. त्यातून त्याला आनंद मिळत होता. आपण काही तरी वेगळ करतो आहोत असं त्याला वाटत होतं. पण पुढे दबा धरुन बसलेल्या मृत्यूने त्याला गाठलचं..

Aug 13, 2013, 09:15 PM IST

जॅकी चॅनचा दुसऱ्यांदा मृत्यू...

‘आपल्याच मृत्यूची बातमी वाचून धक्का बसला आणि वाईटही वाटलं’ असं स्पष्ट केलंय ५९ वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅननं…

Aug 8, 2013, 03:16 PM IST

खड्डय़ांमुळे बाळाचा झाला मृत्यू

मोगरा या गावातील आरोग्य उपकेंद्र कायम बंद असल्याने गर्भवतीला बसमधून तपासणीसाठी माजलगाव येथे नेण्यात येत होते; मात्र रस्त्यातील खड्डय़ांमुळे गर्भवती महिला बसमध्येच प्रसूत झाली.

Aug 6, 2013, 04:52 PM IST

प्रेमाने घेतला २८,१४५ जणांचा बळी !

प्रेम ही ईश्वराची देणगी आहे असं म्हटलं जातं...मात्र आजच्या तरुणाईसाठी प्रेम यमदूत बनलंय...हे आम्ही नाही तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून उघड झालंय...

Jul 23, 2013, 10:42 PM IST

वसईकरांचा 'जीव' खड्ड्यात!

वसईत पावसाळ्यात पडलेले खड्डे आता किलर स्पॉट ठरतायत. एव्हरशाईन परिसरातल्या या खड्ड्यांनी आशा ढमढेरे या महिलेचा बळी घेतलाय. दुर्दैवाची बाब म्हणजे माणिकपूर पोलिसांनी मृत महिलेलाच तिच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलंय...

Jul 22, 2013, 07:11 PM IST