रामदास आठवले

'सेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही'

'सेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही'

Oct 24, 2014, 04:59 PM IST

सेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही – रामदास आठवले

 झाले गेले विसरून जावे, असे म्हणत मत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

Oct 24, 2014, 02:35 PM IST

दलित हत्याकांडाची सीआयडी चौकशी करा - आठवले

रिपब्लिकन नेते रामदास आठवले आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंनी यांनी पाथर्डी तालुक्याला भेट दिली.. ऐन दिवाळीत घडलेल्या दलित हत्याकांडाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी रामदास आठवलेंनी केलीय.. 

Oct 23, 2014, 01:37 PM IST

राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली- रामदास आठवले

संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, सूतासारखा सरळ करेन, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे. मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे लगावला.

Oct 23, 2014, 09:02 AM IST

'हातात नाही आमदारकीचा 'पत्ता', तरीही मी नेता'

भाजपसोबत विधानसभा निवडणुकीत असलेल्या  घटकपक्षांची वाट लागली आहे, आरपीआयचा एक उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही, तरीही आम्हाला दोन मंत्रीपदं द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Oct 21, 2014, 07:05 PM IST

भाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला खरा, पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही. त्या पक्षांचा या विधानसभा निवडणुकीत साफ बाजार उठला आहे.

Oct 20, 2014, 04:26 PM IST

निवडणुकीनंतर सेना-भाजप एकत्र येतील - आठवले

गेल्या २५ वर्षांची युती तोडून वेगवेगळ्या मार्गाने जाताना एकमेकांवर वाट्टेल तसं तोंडसुख घेणारे दोन पक्ष शिवसेना आणि भाजप निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ शकतील, असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. 

Oct 15, 2014, 01:34 PM IST

राज ठाकरेंचं रामदास आठवलेंना उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा आज आरपीआय नेते रामदास आठवले यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी परभणीच्या सभेत रामदास आठवलेंची नक्कल केली होती, त्या नक्कलला लोणावळ्यात रामदास आठवलेंनी शेरेबाजी करून उत्तर दिलं होतं.

Oct 7, 2014, 09:53 PM IST

मेरी 'बेडुकउडी' नहीं 'ढाण्यावाघ' की उडी हैं - आठवले

मेरी 'बेडुकउडी' नहीं 'ढाण्यावाघ' की उडी हैं - आठवले

Oct 6, 2014, 05:18 PM IST

‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले

माझ्या हातात सत्ता द्या, राज्याच सोनं करुन दाखवतो असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला, अशी टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही याची खात्री नसताना ते मला उपमुख्यमंत्रीपद कसं काय देणार असं म्हणत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

Oct 6, 2014, 03:00 PM IST