रेल्वे

मुंबई मुसळधार, हार्बर रेल्वे बंद

मुंबई काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीबरोबरच रस्ता वाहतुकीला बसला आहे. चुनाभट्टी ते कुर्ला दरम्यान मार्गावर पाणी साचल्याने हार्बरची वाहतूक बंद पडलेय. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने ट्राफिक जामचा सामना सहन करावा लागत.

Jul 23, 2013, 03:54 PM IST

रेल्वेचे वेटींग तिकिट काढू नका?

बातमी रेल्वेच्या आरक्षणासंदर्भात. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करतांना जर आता तुमच्याकडे यापुढं कन्फर्म तिकीट नसल्यास तुम्हाला प्रवास करता येणार नाही. वेटींग तिकिट असेल तरीही ते ग्राह्य धरणार नाही. त्यामुळे रेल्वेत नो एंट्रीच.

Jul 23, 2013, 11:01 AM IST

कोकण रेल्वे हाऊसफुल्ल; चाकरमानी वेटींगवर

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा रेल्वेने जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

Jul 9, 2013, 08:09 AM IST

हार्बरची रेल्वे वाहतूक सुरू, गती कमी

हार्बर मार्गावरील गोवंडी ते चेंबूर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मंगळवारी दुपारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मात्र, युद्धपातळीवर काम करण्यात आल्यानंतर हार्बरची सेवा सुरू झाली आहे.

Jun 18, 2013, 06:15 PM IST

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत

शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावासाचा पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. आकुर्डी ते चिंचवड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. डेक्कन क्वीन चिंचवड येथे थांबविण्यात आली होती.

Jun 16, 2013, 10:06 AM IST

बन्सल यांच्या राजीनाम्याचा मुंबईकरांना फटका!

बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर पूर्णवेळ मंत्रीच नाही. त्यातच महत्त्वाची पदं रिक्त आहेत. त्यामुळे निर्णयप्रक्रियाच ठप्प झाली आहे. या सगळ्याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे.

May 13, 2013, 05:39 PM IST

रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक

सीबीआयने रेल्वे लाचप्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे. रेल्वेलाचप्रकरणी आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे.

May 5, 2013, 09:06 AM IST

रेल्वेमंत्री झाले मुंबई रेल्वेवर नाराज....

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मुंबई उपनगरी रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी मंगळवारी टिळकनगर स्टेशन ते सीएसटी असा लोकलनं प्रवास केला.या प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला.

Apr 17, 2013, 10:48 AM IST

चर्चगेट-डहाणू लोकल १६ एप्रिलपासून?

पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी एक खुशखबर. चर्चगेट- डहाणू लोकल १६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. यासंदर्भातलं प्रसिद्धपत्रक सादर करण्यात आले आहे मात्र त्याचवेळी पश्चिम रेल्वेने याबाबत अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.

Apr 10, 2013, 03:18 PM IST

रेल्वे वाय-फायने राहा हाय-फाय...

आजपासून रेल्वतर्फे लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये ऑन बोर्ड वाय-फाय सुविधा सुरू करण्यात येत आहे. सध्या ह्याची सुरूवात दिल्ली-कोलकता राजधानी एक्सप्रेसमधून करण्यात आली आहे. मंगळवारी रेल्वे मंत्री पवन कुमार बंसलच्या तर्फे या सुविधेचं उद्घाटन करण्यात येणार आहे.या वाई-फाईची सुविधा टेक्नो सेट कॉम कंपनीच्या सहयोगाने सुरू करण्यात आहे.

Apr 2, 2013, 02:56 PM IST

रेल्वे, बस प्रवास आजपासून महाग

अर्थसंकल्पातील तरतुदी आज १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. याचा भार आता सामान्यांच्या खिशावर पडणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींसोबत रेल्वेचे आरक्षण आणि बेस्टचा प्रवासही महागणार आहे.

Apr 1, 2013, 06:40 AM IST

बलात्कार पीडितेच्या नावाने नवी रेल्वे?

भारतीय रेल्वेच्या नव्या आगगाडीला नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार पीडित मुलीचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. लवकरच छपरा-आनंद विहार एक्सप्रेस या आठवड्यातून एकदा प्रवास करणाऱ्या रेल्वेला ‘निर्भया एक्सप्रेस’ किंवा ‘बेटी एक्सप्रेस’ हे नाव देण्यात येऊ शकतं.

Mar 14, 2013, 05:03 PM IST

रेल्वे मंत्र्यांच्या राज्यासाठी नव्या घोषणा

रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर राज्यातल्या खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याची रेल्वे मंत्र्यांनी दखल घेऊन राज्यासाठी नव्या घोषणा केल्या आहेत.

Mar 13, 2013, 04:31 PM IST

हार्बरची वाहतूक पूर्ववत, गाड्या उशिराने

वडाळा ते जीटीबी दरम्यान हार्बर मार्गावर लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली तरी गाड्या उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

Mar 5, 2013, 07:53 PM IST

आता महाराष्ट्रातील रेल्वे समस्या मार्गी?

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत फेरविचार व्हावा यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन समस्या दूर करण्याची विनंती केलीय. यावेळी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

Mar 4, 2013, 10:01 AM IST