www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॉलेज म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते रंगीबेरंगी, फॅशनेबल कपड्यांत वावरणारे आणि कट्ट्या-कट्ट्यांवर ‘टाईमपास’ करणारे तरुण-तरुणी... होय ना! पण, हेच चित्र बदलतंय किंबहुना बदललंय असंच म्हणावं लागेल. कारण, सध्याच्या तरुण-तरुणींकडे कॉलेज कट्ट्यावर टाईमपास करण्यासाठी टाईमच उरलेला नाहीए.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती उघड झालीय. कॉलेजच्या दिवसभरातल्या वेळापत्रकातून विद्यार्थ्यांना आपले छंद जोपसता येत नसल्याचं या सर्वेक्षणातून समोर येतंय. मुंबईतल्या एका प्रतिष्ठित कॉलेजनं जवळजवळ ५००० विद्यार्थ्यांवर एक सर्वे केला होता. यामध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजच्या आणि इतर शिक्षणाच्या धावपळीतून स्वत:साठी वेळ काढता येत नसल्याचं निष्पण्ण झालंय.
काय सांगतो हे सर्वेक्षण :
> १५ कॉलेजमधील ५०००विद्यार्थ्यांचा सर्व्हे
> ५० टक्के विद्यार्थ्यांना छंद जोपासण्यासाठी आणि स्वत:साठी वेळ नाही
> ३० टक्के विद्यार्थ्यांना कधीतरीच तशी संधी मिळते
> कॉलेज क्लासची जागा कोचिंग क्लासने घेतल्याचं ७१ टक्के विद्यार्थी सांगतात
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.