सुप्रीम कोर्ट

बीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी

राज्यांची क्रिकेट असोसिएशन जोपर्यंत लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्याचं आश्वासन देत नाहीत तोपर्यंत त्यांना पैसे देऊ नका आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका, असे आदेश सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत. 

Oct 21, 2016, 04:09 PM IST

'धर्मगुरूं'वर कारवाई करता येईल का? - सुप्रीम कोर्ट

धर्मगुरूंचा त्या त्या धर्मावर चांगला पगडा असतो. त्यामुळे धर्मगुरूंनी केलेल्या आवाहनाचा राजकारणात राजकीय नेत्यांना चांगला लाभ मिळतो. निवडणूकीत धर्मगुरूंनी एखाद्या उमेदवारासाठी मतदान करण्याचे आवाहन केले तर धर्मगुरूंना जबाबदार ठरवण्यात येते का? त्यांच्यावर कारवाई करता येईल का? यावर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. धर्मगुरूंवर कोणत्या नियमांतर्गत कारवाई करता येईल, असा सवाल सुप्रीम कोर्टानं केला आहे.

Oct 20, 2016, 11:27 AM IST

सलमान खानच्या अडचणी पुन्हा वाढणार, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

१८ वर्षापूर्वीचं जोधपूर काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेल्या सलमान खानच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात एक विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. जोधपूर हायकोर्टाने २५ जुलैला सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती. राज्य सरकारने तेव्हाच म्हटलं होतं की ते या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार.

Oct 18, 2016, 06:29 PM IST

लोढा समितीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला

सुप्रीम कोर्टानं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा दिला आहे.

Oct 17, 2016, 05:56 PM IST

सुप्रीम कोर्टाचा बीसीसीआयला अल्टिमेटम

लोढा समितीनं दिलेल्या शिफारसी लागू करू असं लेखी आश्वासन देण्याची सक्ती सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयवर केली आहे.

Oct 6, 2016, 04:05 PM IST

लोढा समितीच्या अनेक शिफारशी बीसीसीआयनं फेटाळल्या

लोढा समितीने सुचविलेल्या सुधारणावर आज बीसीसीआय सुप्रीम कोर्टात उत्तर दिलं आहे.

Oct 6, 2016, 11:16 AM IST

मुलांच्या मृत्यूनं सरकारला काहीच फरक पडत नाही - सर्वोच्च न्यायालय संतापलं

मुलांच्या मरणानं महाराष्ट्र सरकारला कुठलाही फरक पडत नाही. सरकारला त्याची चिंता नाही, असं अत्यंत तिखट निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय.

Oct 5, 2016, 06:56 PM IST

मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

पुढच्या वर्षी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना राज्यात आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे. ते तातडीनं सुनावणी करून तीन महिन्यात निकाली काढावं अशी याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रमुख मागणी आहे.

Sep 7, 2016, 03:13 PM IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना कोर्टाचा दणका

महात्मा गांधींच्या हत्येबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना दणका दिलाय. त्यांना यापुढे प्रत्येक सुनावणीवेळी भिवंडी कोर्टात हजर राहावं लागणार आहे.

Sep 1, 2016, 03:38 PM IST

जय जवान गोविंदा पथकाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

जोगेश्वरी येथील मानवी थरांचा विश्वविक्रम करणारे जय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पण त्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. दहीहंडी सण साजरा करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांविरोधात जय जवान गोविंदा पथकाने रिट याचिका दाखल केली होती.

Aug 24, 2016, 01:49 PM IST