सुषमा स्वराज

राष्ट्रपतीपदासाठी या नावांची चर्चा, शिवसेनेची भूमिका काय?

राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

Apr 27, 2017, 09:04 PM IST

सुषमा स्वराजांनी अमेरिकेकडे मागितली २७१ प्रवाशांची संपूर्ण माहिती

भारत सरकारने अमेरिकेकडे त्या २७१ अनधिकृत स्थलांतरीत लोकांच्या प्रकरणांची माहिती मागवली आहे ज्यांना ते दिल्लीला पुन्हा पाठवू इच्छिता. भारताच्या परराष्ट्र खात्याने अमेरिकेला हा संदेश पाठवला आहे.

Mar 25, 2017, 12:21 PM IST

मुंबईकरांना मिळणार आणखी एक पासपोर्ट ऑफीस

लवकरच ईशान्य मुंबई, पूर्व उपनगरातील जनतेला एक मोठा दिलासा मिळणार आहे. गेले अनेक वर्ष या विभागातील रहिवाश्यांची या विभागात पासपोर्ट कार्यालय असावे अशी मागणी होती. याबाबत खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकाकडे पाठपुरावा केला होता.

Mar 19, 2017, 08:32 AM IST

अॅमेझॉनवर तिरंग्याच्या डोअर मॅटची विक्री, भडकल्या सुषमा स्वराज

 कॅनडामध्ये अॅमझॉन साईटवर भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या डोअर मॅटवर सुषमा स्वराज यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 

Jan 11, 2017, 10:52 PM IST

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीत सुधारणा

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीत सुधार होतांना दिसत आहे. त्यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. १० डिसेंबरला त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधार झाला आहे.

Dec 19, 2016, 07:34 PM IST

'ग्लोबल थिंकर्स'च्या यादीत सुषमा स्वराज यांना मानाचं स्थान

२०१६ ग्लोबल थिंकर्सच्या यादीमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना स्थान देण्यात आलंय.

Dec 14, 2016, 12:53 PM IST

सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर एम्समध्ये किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांच्या विशेष टीमला पाचारण करण्यात आलं होते.

Dec 10, 2016, 04:28 PM IST

सुषमा स्वराज यांना किडनी देण्यासाठी पुढे आला ट्रॅफिक पोलीस

किडनी निकामी झाल्यामुळे एम्समध्ये दाखल असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना किडनीदाता सापडला आहे. मध्यप्रदेशातले वाहतूक पोलीस हवालदार गौरव सिंग डांगी यांनी स्वराज यांना आपली एक किडनी देण्याची इच्छा जाहीर केली आहे. स्वराज यांची प्रकृती बिघडल्यानं आपल्याला काळजी वाटत असल्याचं 26 वर्षीय डांगी यांनी म्हटलंय. स्वराज यांनी कालच आपली किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णालात असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Nov 17, 2016, 10:01 PM IST

सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीसाठी देश, विदेशात प्रार्थना

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांना डायलिसिसचा त्रास असल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांची एक किडनी खराब झाल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांच्यावर किडनी ट्रांसप्लांटची शस्त्रक्रिया गरजेची आहे.  सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने देशातीलच नाही तर परदेशातही त्यांचे हितचिंतक चिंता व्यक्त करत आहे. सुषमा स्वराज यांनी अनेकदा परदेशातील व्यक्तींनाही मदत केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत मिळवून दिली आहे. 

Nov 17, 2016, 06:42 PM IST

सुषमा स्वराज यांच्या किडन्या फेल, 'एम्स'मध्ये इलाज

सुषमा स्वराज यांच्या किडन्या फेल, 'एम्स'मध्ये इलाज

Nov 16, 2016, 02:50 PM IST

सुषमा स्वराज यांच्या किडन्या फेल, 'एम्स'मध्ये इलाज

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या किडनी खराब झाल्याचं त्यांनी टवीट करून सांगितलं, किडनी ट्रान्सप्लांटसाठी माझ्या टेस्ट केल्या जात आहेत, भगवान कृष्णांचा मला आशीर्वाद गरजेचा आहे, मी दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं.

Nov 16, 2016, 11:44 AM IST

पाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी पतीची सुषमा स्वराजांकडे याचना...

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे एका भारतीय व्यक्तीनं आपल्या पाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी सोशल मीडियावरून मदत मागितली... आणि ट्विटरवर अॅक्टीव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी या ट्विटर याचिकेला लगेचच प्रत्युत्तरही दिलं. 

Nov 5, 2016, 06:12 PM IST