एन्काऊंटर प्रकरणी अमित शहा हाजीर हो
तुलसीराम प्रजापती एन्काऊंटर प्रकरणी भाजपा नेता अमित शहा यांच्यासह 18 आरोपींना आज कोर्टात हजर रहावं लागणार आहे. 9 मेला मुंबईतल्या स्पेशल सीबीआय कोर्टानं अमित शहा आणि इतर आरोपींना समन्स जारी केलं होतं.
May 23, 2014, 08:23 AM ISTमोदींच्या सभेसाठी वाराणसीत मैदान नाही, परवानगी नाकारली
देशात आज आठव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. १२ तारखेला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडेल. तेव्हा नरेंद्र मोदींच्या वाराणसी इथंही मतदान होणार आहे. त्या अगोदर उद्या नरेंद्र मोदी वाराणसीत सभा घेणार आहेत. मात्र ही सभा आता परवानगीच्या कचाट्यात सापडली आहे.
May 7, 2014, 02:59 PM ISTइशरत जहाँ इन्काऊंटर : अमित शहांना क्लीनचीट
नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआयने अखेर क्लीनचीट दिली आहे. अमित शहा यांना इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे.
May 7, 2014, 02:11 PM ISTअमित शहा हे दहशतवादी - लालू प्रसाद यादव
बिहारमधील राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी अमित शहा हे दहशतवादी असल्याचं म्हटलं आहे.
May 6, 2014, 05:11 PM ISTहेरगिरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या विरोधानंतर काँग्रेसची माघार
महिला पाळत प्रकरणात नवीन सरकार आल्यावर चौकशीसाठी न्यायमूर्तीची नियुक्ती करेल अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलीय.
May 5, 2014, 09:25 PM ISTनिवडणूक आयोगाची `वाचाळ` नेत्यांवर कारवाई
भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आणि सपाचे नेते आझम खान यांच्या सभांवर बंदी घातलीय.
Apr 12, 2014, 07:59 AM ISTअमित शहांच्या भाषणाची निवडणूक आयोग करणार चौकशी
भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी आणि नरेंद्र मोदी यांचा उजवा हात असलेले अमित शहा चांगलेच अडचणीत आले आहेत. `ही निवडणूक अपमानाचा बदला घेण्याची संधी आहे,` या प्रक्षोभक वक्तव्याची राज्य निवडणूक आयोगानं दखल घेतली असून शहा यांच्या भाषणाची सीडी मागवली आहे.
Apr 6, 2014, 05:45 PM ISTसीबीआय प्रमुखांचं `युपीए`बद्दल खळबळजनक वक्तव्य
केंद्रीय अन्वेषण विभागानं गुरूवारी इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात मानले जाणारेअमित शहा यांच्यावर आरोप केले असते तर युपीए सरकारला आनंद झाला असता, असं खळबळजनक वक्तव्य सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांनी केलंय.
Feb 8, 2014, 03:21 PM IST‘आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या करवू शकतात नरेंद्र मोदी‘
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसनं पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलंय. गुजरातमधील गुप्तहेर प्रकरणावरुन काँग्रेसनं मोदींना धारेवर धरलंय. काँग्रेसचे नेते हरिप्रसादनं मोदींवर थेट आरोप केलाय की, नरेंद्र मोदी आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडला मारून टाकू शकतात, म्हणून पीडित तरुणीच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी.
Dec 30, 2013, 04:27 PM ISTमोदी सरकारनं फेटाळला वंजारा यांचा राजीनामा
बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेले आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांचा राजीनामा फेटाळण्यात आलाय.
Sep 4, 2013, 02:46 PM IST`मोदी सरकारच्या सांगण्यावरूनच केली बनावट चकमक`
बनावट चकमक प्रकरणात निलंबित झालेले आणि सध्या तुरुंगात कैद असलेले वादग्रस्त आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिलाय.
Sep 4, 2013, 08:53 AM ISTगुजरातमध्ये भाजप ११४ जागांवर आघाडीवर
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक निकालामध्ये आघाडी घेतली आहे. भाजप ११४ तर काँग्रेस ६४ जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचे सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Dec 20, 2012, 09:47 AM ISTगुजरातमध्ये भाजपला २/3 बहुमत मिळेल – अमित शाह
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला २/3 असे स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा मोदीच सत्तेत येतील, असा दावा माजी गृहराज्य मंत्री आणि नरेंद्र मोदींचे समर्थक अमित शाह यांनी केला आहे.
Dec 20, 2012, 09:14 AM IST