amit shah

भाजप अध्यक्ष अमित शाहांपुढे अनेक आव्हाने?

 भाजपचे दहावे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शाह यांची काल निवड करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळवून दिलं. आता महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडसारख्या राज्यात सत्ता मिळवून देण्याचं आव्हान अमित शाहांपुढं असणार आहे.

Jul 10, 2014, 10:10 AM IST

अमित शाह भाजपचे नवे अध्यक्ष

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत अमित शाह यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि विद्यमान अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी घोषणा केली.

Jul 9, 2014, 12:50 PM IST

नरेंद्र मोदींना अमित शाह का हवेत?

 भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी अखेर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला ऐतिहासिक यश मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शाह यांची निवड निश्चित झाली आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या आज होणा-या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. 

Jul 9, 2014, 11:51 AM IST

अमित शाह भाजपचे नवे अध्यक्ष? उद्या नावाची घोषणा

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची उद्या बैठक होणार असून या बैठकीत अमित शाह यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.

Jul 8, 2014, 11:51 AM IST

भाजपमध्ये येणार संघाचे राम माधव, अमित शहा अध्यक्ष- रिपोर्ट

दिल्लीत झालेल्या सत्तांतरानंतर येत्या काळात होणारे राजकीय बदल लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख राम माधव आता भाजपमध्ये दाखल होणार आहेत.

Jul 7, 2014, 09:58 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे अमित शहांना 'झेड प्लस' सुरक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळचे असलेले भाजप महासचिव अमित शहा यांना 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा दिली जाणार आहे.  

Jul 3, 2014, 02:01 PM IST

अमित शहा होणार भाजपचे नवे अध्यक्ष?

मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये राजनाथ सिंह यांना गृहमंत्री बनविल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाचा अध्यक्ष कोण होणार याची चाचपणी भाजपने सुरू केली आहे

May 29, 2014, 01:22 PM IST