beed

बीडमध्ये गर्भपिशवी काढण्याचा धंदा

डॉक्टर सुदाम मुंडे, डॉक्टर शिवाजी सानप यांच्यावरील कारवाईनंतर बीडमधल्या स्त्रीभ्रूणहत्यांचा मुद्दा पुन्हा गाजतोय. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासांत अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्यात आहेत. परळी, बीडमध्ये केवळ गर्भपात, स्त्री भ्रूणहत्याच होत नाहीत, तर गर्भपिशवी काढून टाकण्याचा धंदाही इथं जोरात असल्याचं तपासात पुढे आले आहे

Jun 4, 2012, 07:48 PM IST

प्रिया सानप यांच्या विरोधातही गुन्हा

बीडमध्ये स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी काल अटक झालेल्या डॉक्टर शिवाजी सानप यांच्या पत्नी प्रिया सानप यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jun 4, 2012, 07:15 PM IST

फरार डॉ. मुंडेकडे कोट्यवधींची माया

स्त्री भ्रूण हत्येतील प्रमुख आरोपी डॉ. सुदाम मुंडे याच्याकडे कोट्यवधी रूपयांची माया सापडली आहे. तो १५० कोटी संपतीची धनी असल्याचे उघड झाले आहे. मुंडे हा अनेक दिवसांपासून फरार असल्याने त्याची माहिती देणाऱ्यासाठी ४० हजारांचे बक्षिसही जाहीर केले आहे.

Jun 4, 2012, 06:56 PM IST

बीडमध्ये मेडिकल दुकानावर छापे

बीडमध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं जिल्ह्यातल्या मेडिकल दुकानावर छापे टाकायला सुरु केलीये. १२ औषध निरीक्षक आणि दोन सहआयुक्त मागील दोन दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत.

Jun 4, 2012, 05:34 PM IST

खासगी सोनोग्राफी सेंटर्स होणार बंद

बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूणहत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने आता कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. यानुसार बीड जिल्ह्यातील खासगी सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे.

Jun 4, 2012, 05:34 PM IST

... तो गर्भ मुलीचाच!

बीडमधील संशयित गर्भपात प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झालाय. या रिपोर्टमुळे सदर गर्भ मुलीचाच असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे ‘स्त्री भ्रृण हत्येच्या’ संशयाला आता पुराव्याचं बळ मिळालंय.

May 21, 2012, 10:22 AM IST

बीडमध्ये गर्भपात करताना महिलेचा मृत्यू

बीडमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. डॉ. सुदान मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करत असतानाच एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

May 19, 2012, 12:10 PM IST

अजित पवारांनी मुंडेंना 'करून दाखवलचं'

बीडमध्ये गेवराईचे भाजपचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांना फोडून राष्ट्रवादीनं झेडपीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. अमरसिंह पंडीत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं बीड झेडपीची सत्ता समीकरणं बदलेलेली आहेत.

Mar 21, 2012, 09:53 AM IST

गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड

सांगली जिल्ह्यात म्हणजे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा तालुक्यातील तीन एकर जमिनीवर अफूची लागवड केली जात असल्याचं उघड झाले आहे. तर कोल्हापुरातही अफुची लागवड करण्यात आल्याचं पुढे आले आहे.

Feb 28, 2012, 06:27 PM IST

अफूच्या शेतीच्या चौकशीचे आदेश

बीड जिल्ह्यातल्या अफूच्या शेतीप्रकरणात महसूल अधिका-यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. खोटी शेती दाखवून अफूची शेती का केली, याची चौकशीनंतर बाब उघड होणार असल्याने कृषी अधिकाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत.

Feb 25, 2012, 04:15 PM IST

काकांवर टीका, मी भाजपचा - धनंजय मुंडे

आपले ज्यांच्याकडून कौतुक व्हायला हवे होते, त्यांच्याकडून ते कौतुक झाले नाही, असा अप्रत्य़क्ष टोला राष्ट्रवादीच्या मंचावरून गोपीनाथ मुंडेना यांना त्यांचे पुतने आमदार धनंजय मुंडे यांनी लगावला. आज माझ्या कार्यकर्त्यांचा जो सन्मान होत आहे, तो पाहण्यासाठी मी इथे आलो आहे, मी अजून भाजप मध्ये आहे, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले.

Jan 19, 2012, 04:11 PM IST

दलित समाजाला बंदुकीची परवानगी ?

ग्रामीण भागातल्या दलित समाजाला स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवानगी मिळाले पाहिजे अशी मागणी रिपाइं नेता रामदास आठवले यांनी केली आहे.

Jan 16, 2012, 09:25 AM IST

अजितदादांचा मुंडेंना दे धक्का

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 संचालकांनी राजीनामे दिलेत. गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेतील भ्रष्टाचार आणि अनियमिततेला कंटाळून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संचालकांनी राजीनामे दिलेत.

Oct 31, 2011, 08:02 AM IST

सावकारीचा पाश महिलेच्या जीवावर

बीड शहरात एका महिलेनं खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. रुपाली देशपांडे असं या महिलेचं नाव आहे.

Oct 19, 2011, 02:04 PM IST