चक्क भर कार्यक्रमात राहुल गांधींना केला 'किस'
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आसामच्या जोरहाटमध्ये एका कार्यक्रमात महिलांनी गराडा घातला. त्यांना गोंजरण्यास सुरूवात करून त्यांचा किस घेण्यासाठी स्पर्धाच लागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राहुल यांना थोडेवेळ काहीच समजले नाही. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी केडे केले आणि राहुलपासून महिलांना दूर ठेवले.
Feb 27, 2014, 09:15 AM ISTसलमान खुर्शीद नरेंद्र मोदी वक्तव्यावर ठाम
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर कडव्या शब्दांत टीका करणारे काँग्रेसचे केंद्रीयमंत्री सलमान खुर्शीद आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.
Feb 26, 2014, 02:45 PM ISTकाँग्रेसच्या यादीत राज्यातील २ 'कॉमन वूमन'?
लोकसभा निवडणुकीत सर्वसाधारण महिलांनाही संधी मिळावी म्हणून राहूल गांधीनी काँग्रेसकडून योग्य महिला उमेदवारांची नावं मागितली होती.
Feb 25, 2014, 11:24 PM ISTएनडीए, काँग्रेस विरोधात ११ पक्ष एकत्र
भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसच्या यूपीएला पराभूत करण्यासाठी परस्पर सहकार्यानं आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय 11 पक्षांनी घेतलाय.
Feb 25, 2014, 11:00 PM ISTवेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ
वेगळ्या विदर्भाच्या मागणी करत पुन्हा एकदा आंदोलन सुरु झाले असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Feb 22, 2014, 07:24 PM ISTहातपाय गळाले, आम्हाला नको हातकणंगले...
एरव्ही जागावाटपाबाबत आणि मतदारसंघ पदरात पाडून घेण्याबाबत रस्सीखेच करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हातकणंगले मतदार संघाबाबत मात्र हात आखडता घेताना दिसतायत.
Feb 20, 2014, 08:11 PM ISTनाना पाटेकरांचे राजकारणाला ना ना!
अभिनेता नाना पाटेकर उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढविण्याची शक्यता असल्याचे वृत्त स्वतः नाना पाटेकर यांनी फेटाळून लावले आहे. मला राजकारण झेपणार नाही आणि राजकारण्यांना मी झेपणार नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी झी मीडियाशी बोलताना दिली.
Feb 18, 2014, 04:04 PM ISTतर राज ठाकरे यांची संपत्ती जप्त करणार – आर.आर. पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टोलविरोधी आंदोलनात झालेल्या नुकसानीची भरपाई राज ठाकरे यांनी दिली नाही तर आम्ही निवडणूक आयोगाला याची माहिती देऊ तरीही भरपाई दिली नाही तर कराची वसुली करतात तशी त्यांची मालमत्ता जप्त करून वसूली केली जाईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलंय.
Feb 17, 2014, 04:21 PM ISTबजेटपेक्षा पक्षाचा जाहिरनामा वाचला असता...
अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी बजेट वाचून दाखवण्य़ापेक्षा, पक्षाचा आगामी जाहीरनामा वाचून दाखवायला हवा होता, अशी टीका भाजपने अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटवर केली आहे. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही टीका केली आहे.
Feb 17, 2014, 02:46 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात महायुतीचा दुसरा मेळावा
राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात महायुतीचा आज दुसरा मेळावा बीडमध्ये होतं आहे. बीडच्या अटलबिहारी वायपेयी मैदानावर महायुतीची ही सभा होत आहे.
Feb 16, 2014, 03:34 PM IST`आप`चे भाजप-काँग्रेसला खुले आव्हान, सरकार बनवा
दिल्लीत भाजप आणि काँग्रेसनं सरकार बनवून दाखवावं, असं आपच्या नेत्यांनी उघड आव्हान दोन्ही पक्षाला दिले आहे. त्याचवेळी भ्रष्टाचाराविरोधात देशभरात झाडू चलाओ यात्रा सुरू करणार असल्याची माहिती नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत देण्यात आली.
Feb 15, 2014, 03:27 PM ISTभाजपला स्वत:चा भ्रष्टाचार दिसत नाही - राहुल
भाजपला स्वत:चा भ्रष्टाचार दिसत नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचा बेळगावात केला. भाजपच्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा चिमटा राहुल यांनी भाजपला काढला.
Feb 15, 2014, 03:13 PM ISTशंभर टक्के टोलमुक्ती अशक्य – अजितदादा
आजच्या घडीला राज्यात शंभर टक्के टोलमुक्ती अशक्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.. काही लहान रस्ते आणि पूलांवरील टोल रद्द करण्याबाबत सकारात्मक असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. राज ठाकरेंच्या टोलविरोधी आंदोलनावर उपमुख्यमंत्र्यांनी टीका केली..
Feb 13, 2014, 09:40 PM ISTटोल नाके बंद, मनसे इम्पॅक्ट नाही - भुजबळ
मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या बैठकीतल्या मागण्यांवर सरकारनं यापूर्वीच विचार केल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. नव्यानं लागू करण्यात येणा-या टोल धोरणात या सर्व बांबीचा समावेश करण्यात आलाय.
Feb 13, 2014, 09:25 PM ISTबंड्याचे `टोल मोल के बोल`
काय राव, आपण आज फूल टू नाराज झालोय, कारण आपल्या साहेबांचं आंदोलन पाच तास पण नाही चाललं.
Feb 12, 2014, 07:09 PM IST