congress

अरविंद केजरीवालांना काँग्रेस, भाजपची कायदेशीर नोटीस

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांत माफी मागावी नाही तर राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. केजरीवाल यांनी काल भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केलीय. त्यामध्ये सोनिया गांधी, शरद पवार, नरेंद्र मोदी, नितीन गडकरींह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामध्ये काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचंही नाव आहे.

Feb 1, 2014, 05:40 PM IST

काँग्रेसची `अॅड गर्ल` अडचणीत...

काँग्रेसला पाठिंबा देणारी भारताची एक सजग मुस्लीम तरुणी म्हणून सध्या घराघरांत दिसणारी `हसीबा अमीन` सध्या अडचणीत सापडलीय. सोशल वेबसाईटवर तिच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला जातोय.

Jan 31, 2014, 12:31 PM IST

ओमर अब्दुल्ला राजीनाम्याच्या पवित्र्यात?

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी यूपीएमधली अंतर्गत धूसफूसही आता बाहेर येऊ लागलीय. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधले संबंध ताणले गेलेत.

Jan 29, 2014, 11:12 AM IST

झी मीडियाचा सर्वात मोठा ओपिनियन पोल

झी मीडियाचा सर्वात मोठा ओपिनियन पोल

Jan 28, 2014, 08:20 PM IST

मी मोदींना घाबरलो नाही- राहुल गांधी

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.

Jan 28, 2014, 11:11 AM IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; निरुपमांचे उपोषण मागे

काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी मुंबईतल्या वीज दराच्या कपातीच्या मुद्यावर सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी वीज दर कपातीबाबत आश्वासन दिल्यानंतर निरुपम यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय.

Jan 27, 2014, 11:34 AM IST

काँग्रेस राज्यसभेचे उमेदवार जाहीर

राष्ट्रवादी आणि भाजपने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेसने आधीच्याच उमेदवारांना उमेदवारी दिला आहे.

Jan 26, 2014, 10:25 PM IST

निरुपम यांचं उपोषण सुटणार, वीजदराबाबत निर्णय?

काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांचं वीजदराबाबतचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. निरूपम यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली.

Jan 26, 2014, 02:08 PM IST

राहुल गांधी आज वर्धा दौ-यावर

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज एक दिवसाच्या वर्धा दौ-यावर येत आहेत. सकाळी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर राहुल गांधी पंचायत राजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Jan 24, 2014, 08:42 AM IST

राज्यसभेच्या सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला

राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, तर शिवसेना-भाजपचा प्रत्येकी 1 उमेदवार सहज निवडून येणार आहे. परंतु सातव्या जागेसाठी चुरशीची निवडणूक रंगणार असून, एखाद्या उद्योगपतीच्या गळ्यात ही जागा पडेल, अशी चिन्हं सध्या तरी दिसतायत...

Jan 22, 2014, 09:33 PM IST

<b>पराभव ओळखून सोनियांनी राहुलला वाचवलं, मोदी बरसले!</b>

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अखेरचा दिवस मोदींनी गाजवला. काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळेच राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या नावाची घोषणा झाली नाही अशी तोफ मोदींनी डागली. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाची चिरफाड मोदींनी केलीय. भारताला आता स्वराज्यासह सुराज्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले.

Jan 19, 2014, 04:00 PM IST

<B> <font color=#cc33cc></font>भाजप कार्यकर्त्यांना मोदींचा नवा मंत्र, सप्तरंगांचं केलं विश्लेषण</b>

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

Jan 19, 2014, 01:43 PM IST

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज - सोनिया गांधी

काँग्रेसवर अनेक आरोप झाले आहेत आणि होत आहेत. संकटे आली मात्र तरीही पक्षाने अनेक संकटे पचवली आहेत. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांच्या लढाईसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात त्या बोलत होत्या.

Jan 17, 2014, 12:52 PM IST

`राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, पण...`

लोकसभा निवडणूक २०१४ च्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना प्रत्यूत्तर म्हणून काँग्रेसकडून युवराज राहुल गांधींचं नाव पुढे करण्यात येईल, अशी चर्चा गेले कित्येक दिवसांपासून सुरू होती. परंतु, ‘तुर्तास तरी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत’ असं आता समजतंय.

Jan 16, 2014, 08:13 PM IST

राहुल गांधींकडून पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे संकेत

काँग्रेस पक्षच 2014 मध्ये सत्तेवर येणार असा विश्वास काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केलाय. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे संकेतही राहुल गांधींनी यावेळी दिले.

Jan 14, 2014, 07:01 PM IST